राष्ट्रीय शिक्षणासाठी आयोग स्थापनार : ट्रम्प 

वृत्तसंस्था
Saturday, 19 September 2020

अमेरिकेत सध्या न्यूयॉर्क टाइम्सकडून ‘ प्रोजेक्ट १६१९’ चालविला जात आहे. अमेरिकेतील ब्रिटिशांच्या वसाहतीत आफ्रिकेतून गुलामांचा पहिला जथ्था १६१९ साली आणण्यात आला होता. त्याचा संदर्भ या प्रोजेक्टला आहे.

वॉशिंग्टन - राष्ट्रवादाला बळ देणाऱ्या शिक्षण व्यवस्थेच्या प्रचारासाठी राष्ट्रीय आयोग स्थापण्याचा विचार असून त्यासाठी लवकरच अध्यादेश जारी केला जाईल, असे अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज जाहीर केले.

नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी आज भाषण केले. ‘१७७६ आयोग’ असे या आयोगाचे नाव असेल आणि अमेरिकेतील विद्यार्थ्यांना देशाच्या इतिहासातील अनेक अतुलनीय घडामोडींबाबत शिकविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन दिले जाईल, असे ट्रम्प यावेळी म्हणाले. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अमेरिकेत सध्या न्यूयॉर्क टाइम्सकडून ‘ प्रोजेक्ट १६१९’ चालविला जात आहे. अमेरिकेतील ब्रिटिशांच्या वसाहतीत आफ्रिकेतून गुलामांचा पहिला जथ्था १६१९ साली आणण्यात आला होता. त्याचा संदर्भ या प्रोजेक्टला आहे. गुलामगिरीचे दुष्पपरिणाम आणि कृष्णवर्णीयांचे अमेरिकेच्या विकासातील योगदान सांगून अमेरिकेच्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा हा प्रयत्न आहे. ट्रम्प यांनी आजच्या या भाषणात या प्रकल्पावर टीका केली. ‘१६१९’ हा प्रकल्प म्हणजे बालकांवर अत्याचार करण्याचा प्रकार असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘देशाची स्थापना स्वातंत्र्याच्या प्रेरणेने नव्हे तर दडपशाहीतून झाली आहे, असे मुलांना शिकविले जात आहे. यासारखे असत्य काही नाही. अमेरिकेची स्थापना गुलामगिरीतून मुक्ती, नागरी हक्कांची प्रतिष्ठापना, साम्यवादाचा पराभव आणि समृद्धीची वाटचाल या साखळीतून झाली आहे. त्यामुळे मुलांना राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी आयोग स्थापणार आहे,’ अशी घोषणा ट्रम्प यांनी केली. १७७६ हे अमेरिकेचे स्थापना वर्ष आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Donald Trump Launches Patriotic Education Commission