फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वीकारला PM कॅस्टेक्स यांचा राजीनामा, नवे पंतप्रधान म्हणून एलिझाबेथ बॉर्न यांची नियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jean Castex

मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये राहणीमानाच्या वाढत्या खर्चाबाबत विधेयक मांडण्याचं आश्वासनही दिलंय.

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी स्वीकारला PM कॅस्टेक्स यांचा राजीनामा

फ्रान्सचे (France) पंतप्रधान जीन कॅस्टेक्स (Jean Castex) यांनी सोमवारी राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (President Emmanuel Macron) यांच्याकडं राजीनामा सुपूर्द केल्यानंतर, मॅक्रॉन यांची अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली. त्यानंतर राष्ट्रपतींनी एलिझाबेथ बॉर्न (Elizabeth Bourne) यांची देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केलीय. तत्पूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय एलिसी यांनी एका निवेदनात म्हटलंय की, पंतप्रधान कॅस्टेक्स सोमवारी औपचारिकपणे राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपती भवनात आले, तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला. त्याच वेळी, या पदासाठी कामगार मंत्री एलिझाबेथ बॉर्न मॅक्रॉन यांची निवड असल्याचं फ्रेंच मीडियामध्ये (French media) सांगण्यात आलंय.

हेही वाचा: नरेला परिसरात चप्पल कारखान्याला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 25 गाड्या दाखल

राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन आणि नवीन पंतप्रधान एलिझाबेथ बॉर्न नवीन फ्रेंच सरकार नियुक्त करण्यासाठी येत्या काही दिवसांत चर्चा करतील. दरम्यान, मॅक्रॉन यांनी फ्रान्समध्ये राहणीमानाच्या वाढत्या खर्चाबाबत विधेयक मांडण्याचं आश्वासनही दिलंय. देशात अन्नपदार्थ आणि ऊर्जा (तेल आणि वायू) च्या किमती वाढत आहेत. या विधेयकाचा मसुदा त्यांचं नवीन सरकार तयार करेल आणि संसदीय निवडणुकांनंतर लगेचच ते सादर केलं जाईल, अशी अपेक्षा आहे.

Web Title: President Emmanuel Macron Accepts The Resignation Of French Pm Jean Castex

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :france
go to top