PM Narendra Modi : नरेंद्र मोदींची भेट फेब्रुवारीमध्ये शक्य; अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे सूतोवाच
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हाइट हाऊसला भेट देण्याची शक्यता फेब्रुवारीमध्ये व्यक्त केली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांची चर्चा होईल, असे ट्रम्प यांनी सांगितले.
वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कदाचित पुढील महिन्यात ‘व्हाइट हाऊस’ला भेट देतील आणि आमची चर्चा होईल, असे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केले. फ्लोरिडाहून परतताना विशेष विमानात पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली.