भारत आणि चीनच्या संबंधामुळे जगाला शांती मिळेल : पंतप्रधान मोदी

वृत्तसंस्था
शनिवार, 9 जून 2018

भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील मजबूत संबंधामुळे जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा मिळण्यास मदत होईल. आज झालेल्या भेटीदरम्यान भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या.

किंगदाओ : भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील मजबूत संबंधामुळे जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चीन दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. यादरम्यान या दोन्ही नेत्यांनी विविध मुद्यांवर चर्चा केली.

पंतप्रधान मोदी सध्या चीन दौऱ्यावर असून, चीनच्या किंगदाहो येथे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय सहकार्यासह विविध मुद्द्यांवर महत्वपूर्ण चर्चा झाली. त्यानंतर पंतप्रधान मोदी बोलत होते. ते म्हणाले, भारत आणि चीन या दोन्ही देशांमधील मजबूत संबंधामुळे जगाला स्थिरता आणि शांतीची प्रेरणा मिळण्यास मदत होईल. आज झालेल्या भेटीदरम्यान भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्याही करण्यात आल्या. तसेच या भेटीत वुहान येथे पार पडलेल्या पहिल्या अनौपचारिक शिखर परिषदेत घेण्यात आलेल्या निर्णयांवरील अंमलबजावणीबाबत आढावा घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या चर्चेपूर्वी पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग अत्यंत उत्साहात भेटले होते. तसेच पंतप्रधान मोदींनी वुहान येथील शी जिनपिंग यांच्या अनौपचारिक भेटीची आठवणही काढली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi Met Chinese President Xi Jinping in Qingdao