मेगनने दिला गोंडस बाळाला जन्म, ब्रिटनच्या राजघराण्यात चिमुकल्याचे आगमन

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 मे 2019

लंडन : ब्रिटन राजघराण्याचे प्रिन्स हॅरी व अभिनेत्री मेगन मार्कल यांना काल मुलगा झाल्याची माहिती आज (ता. 7) ससेक्स रॉयल या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून देण्यात आली. यामुळे ब्रिटन राजघराण्यात राजकुमाराचे आगमन झाले असल्याने आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी 19 मे ला प्रिन्स हॅरी व अभिनेत्री मेगन मार्कल विवाहबंधनात अडकले होते. त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून द ड्युक व डचेस यांना 6 मे 2019 ला मुलगा झाल्याचे सांगितले आहे. मेगन मार्कल व बाळाची प्रकृती स्थिर व उत्तम असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलचा पहिला मुलगा असून ब्रिटीश राजघराण्याच्या वारसा हक्कामध्ये सातव्या क्रमांकाचा दावेदार असल्याचे समजते आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prince Harry And Megan Markel blessed with baby boy