esakal | शिट्टी लावलेल्या करवंटीचा मास्क वापरल्यामुळे शिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

शिट्टी लावलेल्या करवंटीचा मास्क वापरल्यामुळे शिक्षा

शिट्टी लावलेल्या करवंटीचा मास्क वापरल्यामुळे शिक्षा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देनपसार, इंडोनेशिया: इंडोनेशियातील बाली बेटांवरील देनपसार शहरात एका वाहन तळावर सहाय्यकाचे काम करणाऱ्या नागरिकाला मास्कच्या बाबतीत दाखविलेली कल्पकता भोवली. शिट्टी लावलेल्या करंवटीचा त्याने मास्क म्हणून वापर केला, मात्र वैद्यकीय मास्क न घातल्यामुळे त्याला पुश-अप्स काढणे भाग पडले.

हेही वाचा: अफगाण भूमीचा गैरवापर होण्याची भीती

नेनगाह बुदीयासा असे त्याचे नाव आहे. वाहनतळावरील कामासाठी त्याला शिट्टी सारखी वाजवावी लागते. त्यासाठी मास्क सारखा खाली करावा लागत होता म्हणून त्याने ही शक्कल लढविली. अशा मास्कमुळे तो शहरात चर्चेचा विषय ठरला होता.स्थानिक अधिकाऱ्यांना मात्र हा प्रकार पसंत पडला नाही. पोलिसांनी जाब विचारल्यानंतर त्याने कोरोना नियमांची पायमल्ली करण्याचा उद्देश नसल्याचे सांगितले. ४४ वर्षीय नेनगाह याला कामाच्या ठिकाणी पुश-अप्स काढण्याची शिक्षा ठोठावली.

loading image
go to top