Russia Ukraine War : रशियाच्या हद्दीत युक्रेनकडून ड्रोन हल्ले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Putin claims Ukraine drone strikes on Russian territory border protection

Russia Ukraine War : रशियाच्या हद्दीत युक्रेनकडून ड्रोन हल्ले

किव्ह : युक्रेनच्या सैन्याने आज रशियाच्या विविध भागांमध्ये ड्रोन हल्ले केल्याचा दावा रशियाने केला. यापैकी काही हल्ले मॉस्कोपासून शंभर किलोमीटर अंतरापर्यंत झाल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून सीमेवरील संरक्षण वाढविण्याचे आदेश त्यांनी दिले.

रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यांमुळे जीवित हानी झाली नसून इतरही नुकसान झालेले नाही. मात्र, यामुळे रशियाच्या संरक्षण क्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. युक्रेनने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली नसली तरी रशियाने मात्र आरोप ठेवले आहेत. युक्रेनच्या ड्रोनमुळे रशियाच्या दक्षिण व पश्‍चिम भागात हल्ले केल्याचा आरोप आहे. यातील बहुतेक भाग सीमेपासून जवळच असला तरी काही ड्रोन मॉस्कोपासून शंभर किलोमीटरवर पडले.

बाख्मुतमध्ये रशियाचे प्रतिहल्ले

युक्रेनच्या पूर्व भागात असलेल्या बाख्मुत भागात रशियाने आज जोरदार हल्ले केले. बाख्मुत भागात रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे हे शहर पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाले आहे. येथील लोकांच्या जीवाची रशियाला अजिबात फिकीर नसल्यानेच ते वारंवार येथे हल्ले करत आहेत, अशी टीका युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनी केली आहे.