Vladimir Putinsakal
ग्लोबल
Vladimir Putin: युक्रेनला ‘नाटो’प्रमाणे संरक्षणाची हमी; अध्यक्ष पुतीन यांची मान्यता
Ukraine War: रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत युक्रेनसाठी नाटोसारख्या सामूहिक संरक्षण हमीचा पर्याय मान्य केल्याचे वृत्त. हा निर्णय रशियाच्या युक्रेनवरील धोरणात मोठा बदल ठरू शकतो.
न्यूयॉर्क : अमेरिका आणि तिचे युरोपीय मित्रदेश युक्रेनला युद्ध समाप्त करण्यासाठी संभाव्य कराराचा भाग म्हणून ‘नाटो’सारखी सामूहिक संरक्षणाची हमी देऊ शकतात, असे रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत मान्य केले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.