Donald Trump : पुतीन यांना वेड लागलंय; युक्रेनवरील ड्रोन हल्ल्यांनंतर ट्रम्प यांची प्रतिक्रिया
Vladimir Putin : शांतता चर्चेवर सविस्तर चर्चा होऊनही रशियाने युक्रेनवर सतत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केल्याने अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प संतप्त झाले आहेत. ‘पुतीन यांना वेड लागलंय’ अशी त्यांनी सडकून प्रतिक्रिया दिली.
वॉशिंग्टन : युक्रेनमधील युद्ध थांबविण्याबाबत अत्यंत सविस्तर चर्चा केल्यानंतरही रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन अत्यंत थंडा प्रतिसाद देत असल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अस्वस्थ झाले आहेत.