Vladimir Putin : मूळ कारण शोधत तोडगा काढावा; पुतीन यांची अपेक्षा, ‘उदात्त कार्या’बद्दल मोदी, ट्रम्प यांचे आभार
Russia Ukraine : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मोदी आणि ट्रम्प यांच्या शांतता प्रयत्नांचे आभार मानले असून, संघर्षाचे मूळ कारण शोधून तोडगा काढावा, अशी भूमिका मांडली आहे.
मॉस्को : युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे करत असलेल्या ‘उदात्त कार्या’बद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी या दोन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत.