कतार एअरलाइन्सचे विमान धडकले पाण्याच्या टँकरला

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 नोव्हेंबर 2018

कोलकाता : कतार एअरलाइन्सचे एक विमान पाण्याच्या टँकरला धडकले. सुदैवाने यामध्ये कोणतीही मोठी दुर्घटना घडली नसून, विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. ही घटना कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडली.

कतार एअरलाइन्सचे हे विमान विमानतळावरून टेक ऑफच्या तयारीत असताना ही दुर्घटना घडली. बुधवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास कतार एअरलाइन्सचे हे विमान टेक ऑफ करताना पाण्याच्या टँकरला धडकले. त्यामुळे विमानाचा खालच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणाची माहिती विमानतळाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर आता विमानाच्या काही भागाची दुरुस्ती केली जात आहे. कतार एअरलाइन्सचे हे विमान कोलकातापासून दोहासाठी उड्डाण करणार होते. तत्पूर्वी ही घटना घडली.

याबाबत विमानतळाचे संचालक अतुल दीक्षित यांनी सांगितले, की ''प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. याबाबतची माहिती आम्ही नागरी उड्डाण मंत्रालयाला दिली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याचे त्यांच्या अधिकारात आहे''.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Qatar Airways Doha To Kolkata Flight Hit A Water Tanker All Passengers Are Safe