Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्यानंतर कोहीनुर हिऱ्याचे काय होणार ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

queen elizabeth news

Queen Elizabeth : राणी एलिझाबेथ यांच्यानंतर कोहीनुर हिऱ्याचे काय होणार ?

पुणे : Queen Elizabeth Death News ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth) यांचे निधन झाले आहे. ९६ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राणी एलिझाबेथ गतवर्षीपासून आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करत होत्या. त्यांनी ७० वर्षे ब्रिटनवर राज्य केले. एलिझाबेथ यांच्या मुकूटावर जडलेला कोहिनूर हिरा भारताची शान आहे. एका भारतीय व्यक्तीनेच राणीला तो भेट केला होता. राणीच्या मृत्यूनंतर आता कोहिनूर हिऱ्याबाबत लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. अखेर या हिऱ्याचे आता काय होणार? तो परत भारतात येईल का? असे प्रश्न भारतीयाच्या मनाला पडला आहे.

कसा आहे एलिझाबेथ राणीचा मुकुट ?

राणी एलिझाबेथ यांचा मुकुट सोने आणि प्लॅटिनमपासून बनवलेला आहे. या मुकुटाच्या पुढच्या बाजूला 105 कॅरेटचा कोहिनूर हिरा आहे. याशिवाय या मुकुटात छोटे छोटे 2,867 हिरे आहेत. या मुकुटात हिरेजडीत चांदीचे कोटींग त्यावर बारीक नक्षीकाम केले आहे. सोन्याच्या माऊंटमध्ये जडलेल्या रंगीबेरंगी रत्नांमध्ये नीलम, पन्ना आणि मोती यांचा समावेश आहे.सुमारे 1.28 किलो वजनाच्या या मुकुटात अनेक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. नीलमणिपासून ते एडवर्ड द ब्लॅक प्रिन्सच्या रूबीपर्यंत, एलिझाबेथ प्रथमचे मोती आणि एलिझाबेथचे मोती आणि कुलीनन द्वितीयचे हिरे देखील समाविष्ट आहेत.

कोहिनूर ब्रिटनमध्ये कसा पोहोचला?

सुमारे 800 वर्षांपूर्वी भारतात एक चमकणारा दगड सापडला होता. ज्याला कोहिनूर नाव देण्यात आले होते. कोहिनूर हिरा जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी एक आहे. कोहीनूर भारतातील गोलकोंडा खाणीत सापडला. 1849 मध्ये जेव्हा ब्रिटीश वसाहत पंजाबमध्ये आली तेव्हा शेवटचे शीख राजे दलीप सिंग यांनी एलिझाबेथ राणीला तो भेट दिला. तुर्कस्तानच्या तत्कालीन सुलतानने १८५६ मध्ये राणी व्हिक्टोरिया यांना एक मोठा चमतमता हिरा दिला होता. तो देखील राणीच्या मुकुटात आहे.

या कोहिनूर हिऱ्याचे काय होणार?

मृत्यु आधीच एलिझाबेथ राणी यांनी जाहीर केले होते की, जेव्हा प्रिन्स चार्ल्स गादीवर बसतील तेव्हा त्यांची पत्नी कॅमिला, डचेस ऑफ कॉर्नवॉल या तो मुकुट परिधान करतील. 1937 मध्ये किंग जॉर्ज पाचवे यांच्या राज्याभिषेकावेळी राणी एलिझाबेथसाठी बनवलेल्या मुकुटात कोहिनूर बसवण्यात आला. ‘टॉवर ऑफ लंडन’ मध्ये तो प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.

मुकुटाची किंमत किती आहे?

राणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मुकुट मौल्यवान आहे. राणीच्या या मुकुटाची किंमत सुमारे 3600 कोटी असल्याचे सांगण्यात येते. त्याचबरोबर संपूर्ण हिऱ्यांच्या सेटची किंमत 4500 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Queen Elizabeth Who Will Get Kohinoor Crown After Queen Elizabeth Ii Know What Will Happen

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..