रोहिंग्यांचा प्रश्‍न योग्यरितीने हाताळायला हवा होता : स्यू की

पीटीआय
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

हनोई : म्यानमारमध्ये गंभीर बनलेला रोहिंग्यांचा प्रश्‍न व्यवस्थित हाताळायला हवा होता, असे म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांनी म्हटले आहे. हनोई येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या विभागीय बैठकीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. 

हनोई : म्यानमारमध्ये गंभीर बनलेला रोहिंग्यांचा प्रश्‍न व्यवस्थित हाताळायला हवा होता, असे म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांनी म्हटले आहे. हनोई येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या विभागीय बैठकीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या. 

म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर ऑगस्ट 2017 नंतर सतत हल्ले होत आहेत. या हल्ल्याला कंटाळून सुमारे 7 लाख रोहिंग्या म्यानमारच्या राखीन प्रदेशातून बांगलादेशात स्थलांतरित झाले. त्यानंतर बांगलादेशातून भारत आणि चीनकडे स्थलांतरित झाले आहेत. रोहिंग्या निर्वासितांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. रोहिंग्यांना मायदेशी बोलावण्याबाबत म्यानमारवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला आहे. यासंदर्भात रोहिंग्यांचा मुद्दा म्यानमार योग्य तऱ्हेने निकाली काढू शकला असता का? असे विचारले असता स्यूकी म्हणाल्या, ठोस उपाययोजनाच्या आधारे स्थितीवर चांगल्यारितीने नियंत्रण मिळवता आले असते. या वेळी त्यांनी म्यानमारच्या सैनिकांचा बचाव केला.

त्या म्हणाल्या, की सध्या राखीन प्रांतातील सर्व समुदायांना संरक्षण दिले जात आहे. काही ठिकाणी म्यानमारच्या सैनिकांकडून चुका घडल्या आहेत, असे आढळून येते. मात्र, तत्कालीन स्थितीत सैनिकांकडे असणारे पर्याय मर्यादित होते, हेदेखील आपल्याला पाहवे लागेल. सैनिकांनी हा प्रश्‍न आपल्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न केला. तरीही शेवटी हा प्रश्‍न आणखी चांगल्यारितीने निकाली काढता आला असता. या भागातील असंख्य अल्पसंख्याकाची स्थिती नाजूक असून, त्यापैकी काही संपूर्णपणे संपण्याचा धोका आहे. मात्र, त्यात रोहिंग्या मुस्लिम आणि राखीन बौद्धांचा समावेश नाही. जे देशाबाहेर निघून गेले आहेत, त्यांना परत घेण्यास म्यानमार तयार आहे, असेही त्या म्हणाल्या. 

कायदा मोडला म्हणून शिक्षा 

दोन पत्रकारांना दिलेल्या शिक्षेवरून होत असलेली टीका स्यूकी यांनी फेटाळून लावली. या पत्रकारांनी दहा रोहिंग्याचे घडवून आणलेले हत्याकांड उघडकीस आणले होते. यासंदर्भात स्यू की म्हणाल्या, की या प्रकरणात योग्य न्याय झाला नसल्याचे वाटत असेल तर त्यांनी एक बाब लक्षात घ्यावी, ती म्हणजे पत्रकारांनी ऑफिशियल सिक्रेट ऍक्‍टचे उल्लंघन केले आणि म्हणूनच त्यांना शिक्षा झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The questions of Rohingyas should have been handled properly says Syu Kyi