
चिंगदाओ/नवी दिल्ली : वादाच्या किचकट समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नियोजनबद्ध धोरण ठरवावे आणि त्याअंतर्गत ठोस पावले उचलावीत व सीमेवरील तणाव कमी करावा, असा प्रस्ताव संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज चीनचे संरक्षणमंत्री दोंग जुन यांच्यासमोर ठेवला. सीमेची आखणी करण्याची सध्याची यंत्रणाही कायम ठेवावी, असे आवाहन राजनाथसिंह यांनी केले.