1926 सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी लागली विक्रमी बोली; तब्बल इतक्या कोटींना विक्री | Rare 1926 Macallan whiskey sets record for most expensive bottle at Rs 22 crore knp94 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

1926 सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी लागली विक्रमी बोली; तब्बल इतक्या कोटींना विक्री

1926 सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी लागली विक्रमी बोली; तब्बल इतक्या कोटींना विक्री

नवी दिल्ली- मद्य जितके जुने तितके चांगले समजले जाते. खूप वर्षांपासून साठवून ठेवलेल्या मद्यासाठी मद्यप्रेमी लाखो रुपये द्यायला तयार असतात. अशाच एका प्रकरणात मॅकलन व्हिस्कीच्या बॉटलसाठी बोली लावण्यात आली होती. १९२६ सालची ही मॅकलन व्हिस्की बॉटल खरेदीसाठी एकाने तब्बल २.७ मिलियन डॉलर (जवळपास २२ कोटी रुपये) मोजले आहेत.

लंडनच्या सोथबी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात विक्रमी बोली लावण्यात आल्याचं सांगितलं जातं. दुर्मिळ मद्य खरेदीसाठी आतापर्यंत लावण्यात आलेल्या बोलीमध्ये लंडन येथे लावण्यात आलेली बोली सर्वाधिक असल्याचा दावा या क्षेत्रातील जानकारांनी केला आहे. (Rare 1926 Macallan whiskey sets record for most expensive bottle at Rs 22 crore)

१९२६ सालची सिंगल माल्ट मॅकलन व्हिस्कीवर वलेरिओ अदामीचे लेबल आहे. दुर्मिळातील दुर्मिळ म्हणून या व्हिस्की बॉटलकडे पाहिले जात आहे. या मद्याची निर्मिती १९२६ मध्ये करण्यात आली होती, त्यानंतर ६० वर्षे बॅरेलमध्ये ठेवल्यानंतर १९८६ साली बॉटलमध्ये बंद करण्यात आले होते.

मॅकलन व्हिस्कीच्या बॉटलसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात बोली लावण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०१९ मध्ये मॅकलन व्हिस्कीची बॉटल १.८६ मिलियन डॉलर किंमतीला विकण्यात आली होती. त्यावेळसही किंमतीबाबतचा विक्रम मोडला होता.

सोथबीचे प्रमुख जॉनी फॉवले मीडियाशी बोलताना म्हणाले की, मॅकलन व्हिस्की १९२६ ही सर्व बोली लावणाऱ्यांना आणि कलेक्शन करु पाहणाऱ्या सर्वांसाठी पसंदीची आहे. चार वर्षांआधी विक्रम प्रस्थापित झाल्यानंतर पुन्हा एकदा बोलीसाठी ही व्हिस्की आणण्यासाठी मी खूप उत्सूक होतो. इतिहास घडल्याने मी खूप आनंदी आहे. (Latest Marathi News)

टॅग्स :drinking liquor