Mahatma Gandhi Rare Painting: गांधीजींच्या तैलचित्राला विक्रमी किंमत; लंडनच्या ‘बोनहॅम्स’मध्ये १ लाख ५२ हजार पौंडांना विक्री
Gandhi oil painting by British artist Claire Layton sets record: लंडनमधील बोनहॅम्स लिलावात महात्मा गांधींचे दुर्मीळ तैलचित्र तब्बल १ कोटी ७६ लाख रुपयांना विकले गेले. हे चित्र गांधीजींसमोर बसून खास रेखाटले गेले होते.
लंडन : लंडनच्या ‘बोनहॅम्स’ या आंतरराष्ट्रीय लिलाव कंपनीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका ऑनलाइन लिलावात राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या एका अत्यंत दुर्मीळ तैलचित्राला १ लाख ५२ हजार ८०० पौंड म्हणजेच अंदाजे १ कोटी ७६ लाख रुपये एवढी किंमत मिळाली.