Shark Attack: धक्कादायक! शार्कने एका व्यक्तीला जिवंत गिळले; Video Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shark Attack

Shark Attack: धक्कादायक! शार्कने एका व्यक्तीला जिवंत गिळले; Video Viral

एका धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्यो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. इजिप्तच्या हर्घाडा येथील रिसॉर्टमध्ये पोहताना एका रशियन व्यक्तीला शार्क माशाने जिवंत गिळले आहे. (Rare shark attack Russian citizen gets killed in Egypt’s Red Sea Video Viral)

हर्घाडाच्या एका लोकप्रिय इजिप्शियन रिसॉर्टला भेट देणाऱ्या इतर पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यापासून काही फूट अंतरावर एका माणसाला शार्कने जिवंत खाल्लेले पाहिले. ही घटना ड्रीम बीच हॉटेलच्या समुद्रकिनाऱ्यावर घडली. (Latest Marathi News)

हा प्राणघातक हल्ला गुरुवारी झाला. त्यांनी सांगितले की, शार्कच्या हल्ल्यामुळे एका रशियनचा मृत्यू झाला. पीडितेची ओळख 23 वर्षीय ‘व्ही. पोपोव्ह’ अशी करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

ही व्यक्ती पर्यटक नव्हती. पोपोव्ह अनेक महिन्यांपासून इजिप्तमध्ये राहत होता. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शार्क माशा पोपोव्हला आपल्याकडे ओढून घेऊन खाताना दिसत आहे.(Latest Marathi News)