
नवी दिल्लीः यमनच्या हुती बंडखोरांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे घाबरलेल्या जहाज ऑपरेटर्सनी आता जहाजांवर धार्मिक आणि राष्ट्रीय ओळखीचे संदेश लिहिण्यास सुरुवात केली आहे. अनेक जहाजे त्यांच्या ट्रॅकिंग सिस्टममध्ये 'सर्व क्रू मुस्लिम आहेत' असे संदेश टाकत आहेत. हे सर्व केवळ जीव वाचवण्यासाठी केले जात आहे, कारण हूती बंडखोर जहाजांवर सातत्याने हल्ले करत आहेत. याच आठवड्यात हूती बंडखोरांनी दोन जहाजे समुद्रात बुडवली आहेत.