
इच्छामरणाच्या मुद्यावर आज न्यूझीलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्राथमिक निकालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकांनी इच्छामरण कायद्याच्या बाजूने मतदान केले आहे. हा व्यक्तीवरील प्रेमाचा विजय आहे, अशी भावना इच्छामरणाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.
वेलिंग्टन - इच्छामरणाच्या मुद्यावर आज न्यूझीलंडमध्ये सार्वमत घेण्यात आले. प्राथमिक निकालानुसार, देशातील जवळपास ६५ टक्के लोकांनी इच्छामरण कायद्याच्या बाजूने मतदान केले आहे. हा व्यक्तीवरील प्रेमाचा विजय आहे, अशी भावना इच्छामरणाच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
इच्छामरणाचा कायदा अंमलात आल्यास सहा महिन्यांहून जास्त काळ जिवंत राहण्याची शक्यता नसलेल्या अत्यंत आजारी व्यक्तीला सहाय्यकाच्या मदतीने इच्छामरण देता येणार आहे. मात्र, यासाठी दोन डॉक्टरांची मंजुरी आवश्यक आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोण मागू शकते इच्छामरण?
या देशांत परवानगी
बेल्जियम, कॅनडा, कोलंबिया, लक्झेंबर्ग, नेदरलँड, अमेरिकेतील काही राज्ये, व्हीक्टोरिया राज्य (ऑस्ट्रेलिया)
Edited By - Prashant Patil