America: युक्रेन विरोधात भूमिका घेतल्याने विवेक रामास्वामी यांच्या कारवर हल्ला? पोलिसांनी केला वेगळाच दावा

Vivek Ramaswamy Car Attacked By Pro Ukraine Americans
Vivek Ramaswamy Car Attacked By Pro Ukraine Americans

नवी दिल्ली- अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांनी त्यांच्या कारला युक्रेन समर्थक अमेरिकी नागरिकांनी धडक दिल्याचा दावा केला आहे. रामास्वामी यांनी युक्रेनबाबत केलेल्या वक्तव्यामुळे काही युक्रेन समर्थक नाराज आहेत. त्यामुळेच दोन समर्थकांनी कारला धडक दिली असं रामास्वामी म्हणाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती दिली आहे.

रामास्वामी यांनी दोन कारचा फोटो शेअर केला आहे. यात एका कारच्या मागील बाजूचे नुकसान झाल्याचे दिसत आहे. पण, ही कार रामास्वामी यांचीच आहे याबाबत स्पष्टता नाही. आयोवामध्ये गुरुवारी हा प्रकार घडला. ते याठिकाणी प्रचार सभेसाठी आले होते. रामास्वामी यांनी यामधील आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदूस्तान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

Vivek Ramaswamy Car Attacked By Pro Ukraine Americans
Vivek Ramaswamy : पुतीन हुकूमशहा, तर युक्रेनही भला नाही; अमेरिकेला धमकी देणाऱ्या झेलेन्स्कींवर रामास्वामी यांची टीका

युक्रेनसारख्या देशांच्या सीमेवर पैसे खर्च करण्यापेक्षा आपल्या देशाच्या दक्षिण सीमेवर पैसे खर्च करा, अशा आशयाचे वक्तव्य रामास्वामी यांनी केलं होतं. यावरुन काही वर्गाने त्यांच्यावर टीका केली होती. यालाच विरोध म्हणून काही युक्रेन समर्थकांनी जाणूनबुजून त्यांच्या कारला धडक मारली असल्याचा दावा करण्यात आला आहे. (Republican presidential nominee Vivek Ramaswamy Car Attacked By Pro Ukraine Americans)

दुसरीकडे पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे. जाणूनबुजून कारला धडक दिल्याचा दावा खरा वाटत नाही. कारण, तसे पुरावे सापडत नाहीत. तसेच याप्रकरणात आरोपी महिलेने सांगितले की, 'ती आपली कार मागे घेत होती. त्यावेळी मागे असलेल्या रामास्वामी यांच्या कारला ती धडकली. जाणूनबुजून हा अपघात झालेला नाही.' महिलेच्या विरोधात ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

Vivek Ramaswamy Car Attacked By Pro Ukraine Americans
Namrata Sambherao: "ही अमेरिका नाही इथे मराठीच बोलायचं.." हास्यजत्रा फेम नम्रताच्या लेकाचा हट्ट!

रामास्वामी यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'मी बंधनमुक्त संवादावर विश्वास ठेवतो. जे माझा विरोध करतात ते संवादाद्वारे माझ्याशी वाद घालू शकतात. पण, याला हिंसाचाराद्वारे कधीही उत्तर दिले जाऊ शकत नाहीत.' (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com