esakal | भावा मला माफ कर, पण तेवढा मास्क घाल बघू
sakal

बोलून बातमी शोधा

robo

सध्या प्रयोग म्हणून याचा वापर केला जात आहे. जवळ उभे राहिलेल्यांनाही तो अशाच सूचना देतो. याशिवाय स्टोअरमधील कोणत्या भागात जायचे याच्या सूचनाही हाच रोबो देतो. 

भावा मला माफ कर, पण तेवढा मास्क घाल बघू

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ओसाका (जपान)-  आजघडीला कुणालाही सांगण्याची सर्वांत अवघड गोष्ट म्हणजे मास्क घाल...जपानमध्ये यासाठी रोबोलाच तैनात करण्यात आले आहे. 

ओसाकामधील एका स्पोर्टस स्टोअरमध्ये हे चित्र पाहायला मिळते. ग्राहकांना मास्क घालण्याची आठवण रोबो अगदी नम्रपणे करून देतो. रोबोव्ही असे त्याचे नाव आहे. या रोबोमध्ये कॅमेरा आणि लेसर स्कॅनर बसवण्यात आला आहे. त्याद्वारे मास्क न घातलेले ग्राहक तो हेरतो. याशिवाय रांगेत एकमेकांच्या अगदी जवळ उभे राहिलेल्या ग्राहकांनाही तो हेरतो. 

त्यानंतर चाकांच्या मदतीने संबंधित ग्राहकाच्या जवळ जात रोबो संवाद साधतो. तुला त्रास देत असल्याबद्दल मला क्षमा कर, पण कृपा करून मास्क घाल, असे तो सांगतो. या प्रात्यक्षिकाचा एक व्हिडिओ संशोधकांनी पोस्ट केला आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या प्रयोग म्हणून याचा वापर केला जात आहे. जवळ उभे राहिलेल्यांनाही तो अशाच सूचना देतो. याशिवाय स्टोअरमधील कोणत्या भागात जायचे याच्या सूचनाही हाच रोबो देतो. 

जपानमध्ये आतापर्यंत एक लाख २० हजार ८१५ रुग्ण आणि एक हजार ९१३ बळी अशी कोरोनाची आकडेवारी आहे. संसर्ग तेवढा पसरला नसला तरी गेल्या काही दिवसांतील नव्या रुग्णांची संख्या वाढते आहे. एक हजार, पंधराशे आणि दोन हजार असा चढता क्रम नोंदवण्यात आला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

...आणि आभारही मानतो 
क्योटो येथील एटीआर या संशोधन संस्थेने हा रोबो विकसित केला आहे. इलेक्ट्रॉनिक लेखनिक म्हणून त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्राहकांनी सूचनेचे पालन करून मास्क घातल्यानंतर तो आभारही मानतो. ‘थँक यू फॉर अंडरस्टँडिंग- असे म्हणत रोबोव्ही मस्तक आदबीने झुकवितो. 

loading image
go to top