दुसऱ्या लाटेमुळे ब्रिटनमध्ये निर्बंध कडक; स्वयंविलगीकरण टाळल्यास साडेनऊ लाख रुपये दंड

वृत्तसंस्था
Monday, 21 September 2020

स्वयंविलगीकरणास नकार दिल्यास दहा हजार पौंड (सुमारे साडेनऊ लाख रुपये) इतका दंड ठोठावण्यात येईल. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ही घोषणा केली. वायव्य, उत्तर आणि मध्य इंग्लंडमध्ये या निर्बंधांचे काटेकोर पालन केले जाईल.

लंडन - कोरोना संसर्गाची दुसरी लाट उसळल्यामुळे ब्रिटनमध्ये निर्बंध आणखी कडक करण्यात आले आहेत. स्वयंविलगीकरणास नकार दिल्यास दहा हजार पौंड (सुमारे साडेनऊ लाख रुपये) इतका दंड ठोठावण्यात येईल. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ही घोषणा केली. वायव्य, उत्तर आणि मध्य इंग्लंडमध्ये या निर्बंधांचे काटेकोर पालन केले जाईल. ब्रिटनमधील रुग्णांचा आकडा चार लाखांच्या आसपास, तर मृतांची संख्या सुमारे 42 हजार इतकी आहे. आत्तापर्यंत विलगीकरण हा केवळ सल्ला होता; पण आता तो नियम करण्यात आला आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

28 सप्टेंबरपासून लागू
राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या चाचणी-ठावठिकाणा प्रक्रियेनुसार सूचना दिली जाणार
कोरोनाची लक्षणे असलेल्या किंवा संसर्ग झालेल्यांना दहा दिवसांसाठी विलगीकरण अनिवार्य
अशा रुग्णांच्या सहवासातील  व्यक्तींना 14 दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक
दंडाची सुरुवातीची रक्कम :  एक हजार पौंड
आंतरराष्ट्रीय प्रवासानंतर क्वारंटाइन न केल्यास इतकाच दंड
नियम पुन्हा मोडल्यास दहा हजार पौंडापर्यंत रक्कम वाढणार
काम नाही म्हणून कर्मचाऱ्यांचे विलगीकरण केल्यास उद्योग समूह, कंपन्यांनाही दंड
विलगीकरणाच्या कालावधीत घरून काम करणे शक्य नसल्यास 500 पौंडची अतिरिक्त भरपाई
कमी उत्पन्न असलेल्यांना सवलत
सार्वजनिक ठिकाणी वेगवेगळ्या घरांतील कमाल सहाच व्यक्ती एकत्र येऊ शकणार

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निर्बंधांना विरोध
जॉन्सन यांनी देशव्यापी लॉकडाउन पुन्हा लागू करण्यास नापसंती दर्शविली आहे. त्यांच्या पुराणमतवादी पक्षातील काही सहकाऱ्यांनी सध्याच्या निर्बंधांना तीव्र विरोध दर्शविला आहे. शनिवारी ट्रॅफलगार चौकात लसीकरण तसेच लॉकडाउनच्या विरोधात निदर्शने झाली, त्या वेळी पोलिसांनी ३२ लोकांना  अटक केली.

फ्रान्स, स्पेनसह युरोपात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्या देशातही हे झालेले पाहावे लागणे अटळ असेल, असे सांगण्यास भीती वाटते. कोरोनाविरुद्ध सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्येकाने नियमांचे पालन करावे आणि नव्या निर्बंधांमुळे तसे करणे कायद्यानुसार बंधनकारक असेल.
- बोरीस जॉन्सन, पंतप्रधान

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Restrictions in Britain have been tightened as a second wave of corona outbreaks