दुसऱ्या लाटेच्या शक्यतेनंतर  ब्रिटनमध्ये उद्यापासून नवे निर्बंध 

वृत्तसंस्था
Thursday, 24 September 2020

कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर अनेक दिवस नियंत्रण मिळविण्यात यश आल्यानंतर निर्बंध शिथिल होताच रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे अत्यावश्‍यक आहे.

लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वेगाने वाढल्याने येथील सरकारने धोक्याचा स्तर तीनवरून चारवर गेल्याचे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वीच सार्वजनिक ठिकाणी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणाऱ्या सरकारने गुरुवारपासून (ता. २४) आणखी काही मार्गदर्शक सूचना जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवीन नियमांनुसार, रात्री दहा वाजता देशभरातील सर्व पब, बार आणि रेस्टॉरंट बंद केले जातील. देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता असल्याचे देशाचे अध्यक्ष बोरीस जॉन्सन यांनीच दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर अनेक दिवस नियंत्रण मिळविण्यात यश आल्यानंतर निर्बंध शिथिल होताच रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करणे अत्यावश्‍यक आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापरही अनिवार्य आहे, असे आवाहन सरकारने जनतेला केले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: restrictions in Britain from tomorrow following the possibility of a second corona wave