
कामावर जात असताना सरे इथं मलिकची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय.
एअर इंडिया बॉम्बस्फोट प्रकरणातील रिपुदमन सिंह मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या
सरे : कॅनडाच्या (Canada) ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे इथं (Surrey) रिपुदमन सिंह मलिक (Ripudaman Singh Malik) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) कामावर जात असताना सरे इथं मलिक यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय.
रिपुदमन सिंह मलिक 1985 च्या एअर इंडिया (Air India Flight 182 'Kanishka') दहशतवादी बॉम्बस्फोटांतून निर्दोष सुटले होते. या वृत्ताला दुजोरा देताना मलिकचा मेहुणा जसपाल सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की, 'रिपुदमनची हत्या कोणी केली याची आम्हाला माहिती नाहीय. मलिकची धाकटी बहीण लवकरच कॅनडाला जाणार आहे.' एअर इंडिया फ्लाइट 182 'कनिष्क'च्या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींपैकी मलिक एक होता.
हेही वाचा: दगडफेक करणाऱ्यांना 1000, तर बॉम्बस्फोट करणाऱ्यांना 5000 रुपये.. जाणून घ्या हिंसाचार कसा झाला?
बॉम्बस्फोटात 329 नागरिकांचा झाला होता मृत्यू
23 जून 1985 रोजी आयर्लंडच्या किनार्याजवळून कॅनडाहून आलेल्या एअर इंडियाच्या 182 'कनिष्क' या विमानात बॉम्बस्फोट झाला. यात 329 प्रवासी आणि चालक दलाचा मृत्यू झाला. यामध्ये 280 हून अधिक कॅनेडियन नागरिकांचा समावेश होता. यात 29 संपूर्ण कुटुंबं आणि 12 वर्षाखालील 86 मुलांचा समावेश आहे. रिपुदमन मलिक कथितरित्या पंजाबमधील अनेक दहशतवादी घटनांसाठी जबाबदार असलेल्या बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. एअर इंडिया बॉम्बस्फोटातील कथित सूत्रधार तलविंदर सिंह परमारचा तो जवळचा सहकारी होता. विशेष म्हणजे, बब्बर खालसा ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असून अमेरिका, कॅनडा आणि भारतासह अनेक देशांनी त्यावर बंदी घातलीय.
Web Title: Ripudaman Singh Malik Shot Dead In Canada Air India Flight 182 Kanishka Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..