Rishi Sunak : सुनक यांनी लंडनमध्ये जपली भारतीय संस्कृती; गौ पुजेचा व्हिडिओ व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rishi Sunak

Rishi Sunak : सुनक यांनी लंडनमध्ये जपली भारतीय संस्कृती; गौ पुजेचा व्हिडिओ व्हायरल

Rishi Sunak : ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी जन्माष्टमी साजरी केल्यानंतर बछ बारसला गायीची पूजा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर सध्या या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू असून, परदेशातही भारतीय संस्कृती जपल्यामुळे युकेमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी सुनक यांचे कौतुक केले आहे. व्हिडिओमध्ये सुनक पत्नी अक्षता यांच्या शेजारी उभ्या असलेल्या गायीसमोर आरती करताना दिसत आहेत.

सुनक दाम्पत्याने जन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते, मात्र दोन दिवसांपूर्वी साजऱ्या झालेल्या 'बछ बारस'मधील गायीच्या पूजेचा व्हिडिओ त्यांच्या एका समर्थकाने ट्विटरवर शेअर केला आहे. 23 ऑगस्ट रोजी बछ बारस हा सण साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गाय आणि वासराची पूजा करून नवस बोलला जातो. हा सण भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.

ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून बोरिस जॉन्सन यांची जागा घेण्याच्या शर्यतीतील दोन प्रमुख उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांचा सामना ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांच्याशी होत असून, सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्ष 5 सप्टेंबर 2022 रोजी नव्या पंतप्रधानांची निवड करणार आहे. सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या भारतातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या कन्या आहेत.

मारन सेवाथल यांनी सुनक दाम्पत्याचा गो पुजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये मॅरॉनने लिहिले आहे की, 'ब्रिटनचे संभाव्य पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांच्या पत्नीने यूकेमध्ये गौ मातेची पूजा केली. जागतिक पटलावर भारत राज्य करत असल्याचे यातून दिसून येते. आमचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखवायला आम्हाला आता लाज वाटत नाही. जय सनातन धर्म असे सेवाथल यांनी म्हटले आहे.

Web Title: Rishi Sunak Performs Gau Pooja London Video Praise Indians

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..