भारतात मंदिरे आणि प्रार्थनास्थाळावरील हल्ले वाढले; अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टोनी ब्लिंकेन

भारतात मंदिरे आणि प्रार्थनास्थाळावरील हल्ले वाढले; अमेरिकन परराष्ट्र मंत्रालय

भारतात मंदिरे आणि प्रार्थनास्थाळावर हल्ले वाढत आहेत असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन हे म्हणाले आहेत. दरम्यान अमेरिका धार्मिक स्वातंत्र्याबरोबर उभी राहील असंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

(Attack On India People And Worship Places)

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि चीनमध्ये अल्पसंंख्यांकांना लक्ष्य करून मारल्या जात असल्याच्या घटना वाढत आहेत असा दावाही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याने केला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी जागतिक धार्मिक स्वातंत्र्यता अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात भारताबद्दलची ही स्थिती समोर आली आहे. भारतातील अल्पसंख्यांक लोकांवर आणि मंदिरांवर हल्ले केले जात असल्याचा दावाही या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुरीच्या जगन्नाथ मंदिरात बेकायदा उत्खनन; आरोप करणारी याचिका फेटाळली

"अमेरिका जगभरातील धार्मिक स्वातंत्र्यासाठी उभा राहणार आहे. धार्मिक स्वातंत्र्य वाढवण्यासाठी आम्ही सरकार, बहुपक्षीय संस्था, नागरी समाज यांच्यासोबत काम करत राहू" असं ब्लिंकन यांनी सांगितले. गुरुवारी वार्षिक आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालाचे प्रकाशन करताना ते बोलत होते.

अमेरिकेने आपल्या अहवालात सांगितलंय की, भारतात अनेक ठिकाणी मुस्लीम अल्पसंख्यांकावर आत्याचतार होत आहेत. हिंदूविरोधात बोलणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्याचबरोबर दिल्लीत झालेल्या हल्ल्याचा उल्लेखही या दरम्यान करण्यात आला आहे. दरम्यान अमेरिकेच्या या रिपोर्टचे अमेरिकन मुस्लीम परिषदेने कौतुक केले आहे.

Web Title: Rising Attacks People Places Worship India Us Secretary State Tony Blinken

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :attackglobal news
go to top