

Possibility of increase in crude oil prices in international market
Sakal
रियाध : आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस अधिक चिघळत चालली असून सौदी अरेबियाची राजधानी रियाध आज भीषण क्षेपणास्त्र हल्ल्याने हादरली आहे. येमेनमधील हुती (Houthi) बंडखोरांनी रियाधमधील अत्यंत संवेदनशील आणि अतिमहत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या 'किंग अब्दुल्ला फायनांशियल डिस्ट्रिक्ट'ला थेट निशाणा बनवले. या हल्ल्यामध्ये जगप्रसिद्ध अरामकोच्या (Aramco) टॉवरचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण आखातात युद्धाची ठिणगी पडली आहे. या भीषण हल्ल्याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार, हुती बंडखोरांनी डागलेली क्षेपणास्त्रे थेट सौदी अरेबियाच्या आर्थिक राजधानीच्या केंद्रावर आदळली.