इराणकडून पुन्हा अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला; ट्रम्प यांचा इशारा

वृत्तसंस्था
Monday, 13 January 2020

इराणने अमेरिकेच्या इराकमधील अल-बलाद या हवाई तळावर हल्ला केला. एफ-16 या लढाऊ विमानांचे हे मुख्य हवाई तळ आहे. आपल्या हवाईदलाची क्षमता वाढविण्यासाठी इराकने एफ-16 हे लढाऊ विमान अमेरिकेकडून खरेदी केले होते.

वॉशिंग्टन : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती आणखी भडकताना दिसत असून, इराणने इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार सैनिक जखमी झाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

इराणने अमेरिकेच्या इराकमधील अल-बलाद या हवाई तळावर हल्ला केला. एफ-16 या लढाऊ विमानांचे हे मुख्य हवाई तळ आहे. आपल्या हवाईदलाची क्षमता वाढविण्यासाठी इराकने एफ-16 हे लढाऊ विमान अमेरिकेकडून खरेदी केले होते. या हल्ल्यात 4 जण जखमी असून, यात इराकचे 2 लष्करी अधिकारी आणि 2 एअरमन आहेत. यापूर्वीही 8 जानेवारीला इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला केला होता  

बगदादपासून साधारण 70 किमी अंतरावर असलेल्या या तळावर हल्ला केल्याने अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. नुकतेच इराणने चुकून विमान पाडल्याची कबुली दिल्यानंतर इराणमधील नागरिकांनी सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे. याविषयी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत म्हटले आहे, की आम्हाला इराणमध्ये अन्यायाविरोधात लढणाऱ्या आंदोलकांना मारायचे नाही. मात्र, रविवारी इराणने पुन्हा हल्ला केल्यानंतर अमेरिका आता गप्प बसणार नाही, हे आता निश्चित आहे. इराणबाबतची भूमिका सौम्य झाल्यानंतर अमेरिका इराणच्या नेत्यांशी चर्चा करायला तयार होते. मात्र, या हल्ल्यानंतर चर्चा होणे कठीण आहे”, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rockets hit Iraq base hosting US troops says Military