रोहिंग्यांकडून मुलींची तस्करी 

पीटीआय
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

न्यूयॉर्क : बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांची संख्या सुमारे दहा लाखांपर्यंत पोचली असून, रोहिंग्या निर्वासित हे उपासमारीला आणि हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून बांगलादेशात मजुरीसाठी आपल्या पोटच्या मुलींची विक्री करत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. 

न्यूयॉर्क : बांगलादेशातील रोहिंग्या निर्वासितांची संख्या सुमारे दहा लाखांपर्यंत पोचली असून, रोहिंग्या निर्वासित हे उपासमारीला आणि हालाखीच्या परिस्थितीला कंटाळून बांगलादेशात मजुरीसाठी आपल्या पोटच्या मुलींची विक्री करत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. 

संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्वासित संस्थेने (आयओएम) रोहिंग्या निर्वासिताच्या स्थितीची माहिती दिली. गेल्या वर्षभरापासून दारोदार भटकणारे आणि आर्थिक अडचणीत अडकलेले हतबल रोहिंग्या कुटुंब हे आपल्या मुलींना धोकादायक वातावरणात आणि स्थितीत काम करण्यासाठी बांगलादेशात जबरदस्तीने पाठवत आहेत. मानवी तस्करीत अडकलेल्या महिला आणि मुलीपैकी दोन तृतीयांश महिला कॉक्‍स बाजारातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मदतनिधीचा लाभ घेत आहेत. या तस्करीमुळे सुमारे दहा टक्के महिला आणि मुली लैगिंक शोषणाला बळी पडल्याचे म्हटले आहे. यापासून पुरुष आणि मुलेदेखील अपवाद नाहीत. जबरदस्तीने मोलमजुरी करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांचे प्रमाण एक तृतीयांश इतके आहे.

हतबल स्थितीचा सामना करणाऱ्या काही पीडितांनी धोकादायक स्थितीची माहिती अन्य कोणालाही दिली नाही. त्यामुळे त्यांना आता कोणतीच बाब अवघड वाटत नाही. संस्थेच्या माहितीनुसार रोहिंग्या निर्वासितांची संख्या दहा लाखांपर्यंत पोचली आहे. ऑगस्ट 2017 पासून रोहिंग्या निर्वासितांच्या प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केले आहे.

आयओएमच्या मानवी तस्करीविरोधी आणि सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत सुमारे शंभर नागरिकांची तस्करीतून सुटका केली आणि त्यांना कॉक्‍सबाजारात परत येण्यात मदत केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Rohingya girls Trafficking