
इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवा; पाकिस्तानात हाय अलर्ट
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येच्या अफवा पाकिस्तानात पसरल्या आहेत. त्यामुळे इस्लामाबाद पोलिसांना हाय अलर्ट जारी करण्याचे आदेश दिले आहेत आहे. काल रात्री रात्री उशीरा सुरक्षा यंत्रणांनी पोलिसांना हे आदेश दिले आहेत.
(High Alert In Islamabad)
"पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे अध्यक्ष इम्रान खान हे बनी गाला येथे येणार असल्याची माहिती आहे, त्यामुळे या भागातील सुरक्षा वाढवण्यात आली असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आतापर्यंत इस्लामाबाद पोलिसांना इम्रान खानच्या टीमकडून हत्येच्या संदर्भातील कोणतीही माहिती मिळाली नाही.” असं इस्लामाबाद पोलिसांनी ट्विट करत सांगितलं आहे.
हेही वाचा: 'मिट्टी बचाओ आंदोलना'त पंतप्रधान मोदी होणार सहभागी
इस्लामाबादमध्ये असलेल्या बनी गाला या भागात पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. दरम्यान आज इम्रान खान या भागात येण्याची शक्यता असल्यामुळे पोलिस त्यांना पूर्ण सुरक्षा पुरवणार आहेत. पण आद्याप त्यांच्या येण्याची अधिकृत माहिती त्यांच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही. असं ट्वीट इस्लामाबाद पोलिसांनी केलं आहे.
"आमचे नेते इम्रान खान यांना काही झाले तर तो पाकिस्तानवरील हल्ला मानला जाईल. आम्ही आक्रमकपणे त्याला प्रत्युत्तर देवू" असं इम्रान खान यांचे पुतणे हसन नियाझी म्हणाले आहेत.
हेही वाचा: शरद पवार पुढाकार घेत नाही, तोपर्यंत देशात पर्यायी सरकार अशक्य, शिवसेना नेत्याचं विधान
दरम्यान मागील सरकारवर निशाणा साधत पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी शनिवारी कामाच्या संथ गतीबद्दल नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचा विकास बलुचिस्तानमधील शांतता, स्थैर्य आणि प्रगतीशी निगडीत आहे, असं पंतप्रधान शेहबाज शरीफ म्हणाले आहेत.
Web Title: Rumors Of Imran Khans Assassination Pakistan High Alert
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..