पाकिस्तानसाठी रशिया आला धावून, अमेरिकेवर केला मोठा आरोप

पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्यात रशियानेही उडी घेतली आहे.
Pakistan PM Imran Khan And Russian President Vladimir Putin
Pakistan PM Imran Khan And Russian President Vladimir Putin esakal

माॅस्को : पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्यात रशियानेही उडी घेतली आहे. रशियाने इम्रान खान यांनी केलेल्या आरोपांचे समर्थन करत म्हटले आहे, की अमेरिका पाकिस्तानच्या (Pakistan) राजकारणात हस्तक्षेप करत आहे. अमेरिका इम्रान खान यांना माॅस्को दौरा केल्याची शिक्षा देत असल्याचा आरोप रशियाने (Russia) केला आहे. या अगोदर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी (ता.तीन) वरिष्ठ अमेरिकन राजनैतिक अधिकारी डोनाल्ड लू हे अविश्वास प्रस्तावाच्या माध्यमातून त्यांचे सरकार पाडण्यासाठी परदेशी कटात सामील झाले होते. आता यावर रशियाने प्रतिक्रिया दिली आहे. (Russia Allegation On America For Making Instable Imran Khan Government)

Pakistan PM Imran Khan And Russian President Vladimir Putin
'भारताकडून युक्रेन-रशिया युद्ध थांबविण्याचा प्रयत्न', ऑस्ट्रेलियाकडून मोदींचं कौतुक

पाकिस्तानच्या अंतर्गत कामांमध्ये अमेरिकेने निर्लज्जपणे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री म्हणाले, की अमेरिकेने आदेश न पाळणाऱ्या इम्रान खानला शिक्षा करण्याची मागणी केली आहे. एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा म्हणाल्या, की रशियाला माहीत झाले आहे, की राष्ट्रपती डाॅ.आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या सल्ल्यावर ३ एप्रिल रोजी नॅशनल असेंबली भंग केली. ते म्हणाले, या वर्षी २३-२४ फेब्रूवारी रोजी इम्रान खान हे माॅस्कोच्या दौऱ्याची घोषणा केल्यानंतर अमेरिका आणि त्यांच्या पाश्चात्त्य सहकारी देशांनी पंतप्रधानांवर कठोर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती.

Pakistan PM Imran Khan And Russian President Vladimir Putin
महामुंबईत घरांचे भाव वाढणार; रशिया-युक्रेन युद्धाचा फटका

दौरा रद्द करण्यासाठी एक अल्टिमेटमही दिला होता. रशियने विदेशी मंत्रालय म्हणाले, हे सर्व अडथळे असूनही लू यांनी वाॅशिग्टनमध्ये पाकिस्तानी राजदूताला बोलावले आणि दौरा लवकर संपवा, अशी मागणी केली. ती मागणी फेटाळण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com