
न्यूयॉर्क : ‘‘शांततेसाठी तयार असल्याचे स्पष्ट संकेत रशियाकडून मिळाले असून युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की यांनीही पत्र लिहीत चर्चेसाठी तयार असल्याचे कळविले आहे,’’ असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सांगितले. युक्रेनबरोबर खनिज आणि सुरक्षासंबंधी करारही करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.