Russia Ukraine War : ड्रोन-क्षेपणास्त्रांचा कहर; खारकिव्हवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला
Drone Strike : रशियाने खारकिव्ह शहरावर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात तीन मृत्यू, २१ जखमी तर १८ इमारतींचे नुकसान झाले. शस्त्रसंधीच्या शक्यतेवर पाणी फिरवणारे हे युद्धातील तीव्र हल्ले मानले जात आहेत.
किव्ह : रशियाने खारकिव्ह शहरावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्यात आला. या हल्ल्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण जखमी झाले. रशियाचे रात्रभर हल्ले सुरू असून, २१५ क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ले केले.