esakal | रशियाची कोरोनावरील लस लाखो लोकांना देणं घातक; वाचा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया
sakal

बोलून बातमी शोधा

putin and vaacine.jpg

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी जगातील पहिली कोरोनावरील लस तयार केल्याची घोषणा केली.  त्यांच्या या घोषणेनंतर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

रशियाची कोरोनावरील लस लाखो लोकांना देणं घातक; वाचा जगभरातील देशांच्या प्रतिक्रिया

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

रशिया- रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी जगातील पहिली कोरोनावरील लस तयार केल्याची घोषणा केली.  त्यांच्या या घोषणेनंतर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक देशांनी रशियाच्या लसीबाबत सांशकता व्यक्त केली आहे. तर काही देशांनी रशियाच्या लसीबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. 'स्पुटनिक v' नावाच्या लसीला रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने मंजूरी दिली आहे. विशेष म्हणजे रशियाने तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी न करताच लसीला बाजारात आणण्याचा प्रयत्न करत आहे.

सलग आठव्या दिवशी देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा अमेरिका, ब्राझीलपेक्षाही अधिक

रशियाने लस तयार करण्यात घाई दाखवली आहे. लस सर्वसामान्यांना देण्याच्या आधी त्याचे मुल्यांकन होणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. आम्ही रशियाशी संपर्क ठेवून आहोत. तसेच लस सुरक्षित आणि प्रभावी ठरण्यासाठी कठोर मुल्यांकन गरजेचं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते तेरिक जसेरेविक म्हणाले आहेत.  

लाखो लोकांना लसीचा डोस देणे घातक

जर्मीनीचे आरोग्य मंत्री जेन्स स्पान यांनी रशियाच्या लसीबाबत अविश्वास दाखवला आहे. रशियाने लसीची आवश्यक तेवढ्या चाचण्या घेतल्या नाहीत. त्यामुळे लाखो लोकांना लसीचा डोस देणे घातक आहे. काही विपरित घडलं तर अनेकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले आहेत. ब्रिटनने रशियाची लस वापरणार नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे.

रशियाने फिलीपींसला कोरोनावरील लस देण्याची ऑफर दिली आहे. फिलीपींसचे राष्ट्रपती रोड्रियो दुतेर्ते यांनी ही ऑफर स्वीकारली आहे. रोड्रियो यांनी सर्वात आधी ही लस टोचून घेणार असल्याचं म्हटलं आहे. ते लसीचा डोस घेऊन रशियाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. लसीचा सर्वात आधी माझ्यावर प्रयोग केला जाईल, मला काहीही अडचण नाही. मला रशियाच्या लसीवर विश्वास असल्याचं ते म्हणाले आहेत. दुतेर्ते व्लादिमीर पुतीन यांना आपला आदर्श मानतात. सर्बियाचे राष्ट्रपती अलेक्झांडर वुकीक यांनीही रशियाच्या लसीवर विश्वास दाखवला आहे. सर्बियन वैज्ञानिकांनी रशियाची लस सुरक्षित असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ही लस सर्वात आधी टोचून घेण्यास मला आवडेल असं ते म्हणाले आहेत. 

अमेरिकेची लसीवर गंभीर शंका

अमेरिकेने रशियाच्या 'स्पुटनिक V'लसीवर  सांशकता घेतली आहे. अमेरिकेतील संसर्ग आजार तज्ज्ञ डॉक्टर अॅनथनी फौकी यांनी रशियाच्या लसीबाबत गंभीर शंका असल्याचं म्हटलं आहे. लस निर्माण करणे आणि ती प्रभावी ठरणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अमेरिकेची कोरोनावरील लसही प्रभावी ठरत आहे. आम्हीही लस निर्माण केल्याची घोषणा करु शकतो. मात्र, आम्ही असं करणार नाही. लसीबाबत पूर्ण खात्री झाल्यानंतरच ती आम्ही बाजारात आणू. हजारो लोकांचा जीव आम्ही धोक्यात घालणार नाही, असं फौकी म्हणाले आहेत.

सुशांतसिंह प्रकरणाच्या आड नेमके काय शिजतेय?

इस्त्राईलची लस खरेदीची तयारी

रशियाकडून लस आयात करण्याबाबत विचार करावा लागेल. मात्र, आम्ही सुरक्षा आणि प्रभावीपणाला महत्व देऊ, असं जपानचे आरोग्यमंत्री काटसूनोबू काटो म्हणाले आहेत. इस्त्राईलनेही रशियाच्या लसीबाबत भाष्य केलं आहे. लसीची सुरुक्षा सिद्ध होत असेल तर आम्ही लस खरेदी करण्याचा प्रस्ताव रशियासमोर ठेवू असं इस्त्राईलचे आरोग्य मंत्री म्हणाले आहेत.  

रशियासाठी लसीचा पुरवढा करणे हे प्रतिष्ठेची बाब आहे. देशांना लसीचा पुरवढा करुन रशिया स्वत:ला अमेरिका आणि रशियापेक्षा पुढे असल्याचं दाखवू इच्छित आहे. तसेच पहिली लस तयार केल्याचा मानही रशिया मिळवू पाहात आहे. दरम्यान, लसीला एका विशिष्ठ प्रक्रियेतून जावं लागतं. त्याच्या नियमामध्ये बदल केला जाऊ शकत नाही. रशियाने घाईमध्ये लस तयार केली आहे. लसीचे वाईट परिणाम लोकांवर दिसू शकतात, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. 

(edited by-kartik pujari)

loading image