अखेर प्रतिक्षा संपली; रशियाची कोरोना लस याच आठवड्यात सर्वसामान्यांसाठी उपलब्ध

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 7 September 2020

कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार Russia Covid-19 vaccine केल्याचा दावा करुन रशियाने मागील महिन्यात सगळ्यांनाच आश्चर्याचकित केलं होतं.

मॉस्को- कोरोना विषाणूवर प्रभावी लस तयार Russia Covid-19 vaccine केल्याचा दावा करुन रशियाने मागील महिन्यात सगळ्यांनाच आश्चर्याचकित केलं होतं. आता रशियाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. कोरोनावरील लस आठवड्याभरात सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध public use होणार असल्याची माहिती देशातील एका मोठ्या अधिकाऱ्याने दिले आहे. TASS Russian वृत्त संस्थेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

देशाच्या आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर स्पुटनिक V मोठ्या प्रमाणात वापरणे सुरु करण्यात येईल, असं रशियातील संशोधन अधिकारी डेनिस लोगुनोव्ह म्हणाले आहेत.  काही दिवसांमध्ये आपल्या लशीच्या वापरासाठी परवानगी मिळेल. सर्वसामान्यांवर या लशीचा वापर करण्यासाठी एक विशिष्ठ प्रक्रिया असते. सर्व सुरक्षा निमयांमधून लशीला जावं लागतं. काही दिवसांमध्ये म्हणजे १० ते १३ सप्टेंबरदरम्यान लशीच्या सर्वसामान्यांवरील वापराला परवानगी मिळेल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात लशीकरण मोहीम हाती घेण्यात येईल, असं डेनिस लोगुनोव्ह यांनी सांगितलं.

खुशखबर! रशियाने कोरोना लशी संबंधी डेटा दिला भारताला; तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

लशीचे वितरण रशियाच्या आरोग्य विभागाकडून पार पडणार आहे. उच्च-असुरक्षित असलेल्या गटाला सर्वात आधी लस देण्यात येणार आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी, वृद्ध व्यक्ती आणि शिक्षकांचा समावेश असणार आहे. लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जात असून कमी काळात अधिक लोकांपर्यंत ही लस पोहोचवण्याचे आमचे लक्ष्य असणार असल्याचं लोगुनोव्ह म्हणाले.

रशियाच्या वैज्ञानिकांनी ४ सप्टेंबर रोजी लॅसेंटमध्ये कोरोना लशी संदर्भात शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. यात लस दोन्ही टप्प्यातील मानवी परिक्षणामध्ये यशस्वी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच डोस देण्यात आलेल्या स्वयंसेवकांच्या शरीरात कोणतेही दुष्परिणाम दिसले नसल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे जगातील अनेक देशांचे रशियाच्या कोरोना लशीकडे लक्ष लागले आहे. भारतासह २० देशांनी रशियाच्या लशीमध्ये रस दाखवला आहे. रशियाने नुकतेच भारतासोबत लशीसंबंधातील माहिती शेअर केली आहे. त्यामुळे रशियाच्या स्पुटनिक V लशीचे भारतात तिसऱ्या टप्प्यातील परिक्षण पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, जगभरातील अनेक देश कोरोनावर प्रभावी लस निर्माण करण्याच्या शर्यतीत आहे. अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि चीन या देशांच्या लशीने मानवी चाचणीचा टप्पा गाठला आहे. मात्र, रशियासोडून इतर कोणत्याही देशाने कोरोना लशीचा वापर सर्वसामान्यांवर करण्याचा कोणताही इरादा व्यक्त केला आहे. हे देश २०२१ च्या सुरुवातील कोरोना लस बाजारात आणण्याची शक्यता आहे.  

(edited by- kartik pujari)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia Covid19 vaccine will release for public use this week