रशियाने दुसरी लसही बनविली; पहिल्या लशीमधील दुष्परिणाम दूर केल्याचा दावा

वृत्तसंस्था
Monday, 24 August 2020

रशियाने 11 ऑगस्ट रोजी स्पुटनिक व्ही नाव असलेल्या पहिल्या लशीची घोषणा केली. त्यासाठी घाई केल्यामुळे टीका होत असतानाच दुसऱ्या लशीची माहिती जाहीर करण्यात आली. स्पुटनिक लशीचे दुष्परीणाम होतात.

मॉस्को - रशियाने कोरोनावरील दुसऱ्या लशीची निर्मिती करीत असून प्रयोगशाळेतील चाचण्या पुढील महिन्यात पूर्णत्वास येण्याची अपेक्षा आहे. पहिल्या लशीतील दुष्परिणाम यात होत नसल्याचा दावा करण्यात आला.

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकल्पात उंदरावर केले जाणारे प्रयोग माणसांवर करण्यात आले. त्यासाठी स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली. त्यांना डोस दिल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम दिसले नाहीत. रोस्पोट्रेब्नाद्झोर या आरोग्य क्षेत्रातील प्रमुख संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार 57 जणांना लस टोचण्यात आली. त्यातील 43 जणांना डमी औषध देण्यात आले. एखाद्या उपचारानंतर रुग्णाला काळजी वाटत असेल तर असे एखादे द्रव्य दिले जाते, जे प्रत्यक्षात औषध नसते. चाचण्या सुरू असताना 23 जणांना केंद्रात दाखल करण्यात आले होते. 14 ते 21 दिवसांच्या अंतराने दोन इंजेक्शन दिल्यानंतर प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा लशीचा उद्देश आहे. ऑक्टोबरमध्ये नोंदणी करून नोव्हेंबरमध्ये उत्पादन सुरू करण्याची रशियाला आशा आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रशियाने 11 ऑगस्ट रोजी स्पुटनिक व्ही नाव असलेल्या पहिल्या लशीची घोषणा केली. त्यासाठी घाई केल्यामुळे टीका होत असतानाच दुसऱ्या लशीची माहिती जाहीर करण्यात आली. स्पुटनिक लशीचे दुष्परीणाम होतात. त्यामुळे सूज येणे, वेदना होणे, तीव्र ताप चढणे, लस टोचलेल्या ठिकाणी खाज सुटणे असे त्रास होत असल्याचा दावा करणाऱ्या बातम्या आल्या. दुसरी लस टोचण्यात आलेल्या 57 स्वयंसेवकांनी मात्र अशा त्रासाच्या तक्रारी केल्या नाहीत असे सांगण्यात आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या मुलीलाही लस टोचण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केल्यानंतर काही दिवसांत स्वयंसेवकांनी अशा त्रासाच्या तक्रारी केल्या. दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) पुढील वर्षाच्या प्रारंभापूर्वी प्रमाणित लस येणार नाही असे गेल्याच महिन्यात जाहीर केले होते.

१३ संभाव्य लशी
या प्रकल्पात १३ संभाव्य लशी बनवण्यासाठी संशोधन सुरू आहे. सर्व लशींची प्रयोगशाळेतील प्राण्यांवर चाचणी घेतली आहे.

इपीव्हॅक कोरोनाबद्दलही...
पहिल्या लशीच्या परिणामकारकतेबद्दल अनेक ठिकाणी शंका घेण्यात आल्यानंतर दुसऱ्या लशीबद्दलही हेच होईल, असा टोला रशियाने लगावला आहे.

क्षेपणास्त्र कारखान्यात...
व्हेक्टर स्टेट रिसर्च सेंटर ऑफ व्हायरॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी असे नाव असलेला प्रकल्प सायबेरियामध्ये आहे. सोव्हिएत महासंघाच्या काळातील अवैध जैविक शस्त्रे बनविण्यात तेथील प्रयोगशाळेत महत्त्वपूर्ण टप्पा पार पाडला  जायचा. आता साऱ्या जगात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia made a second vaccine Claims to eliminate side effects from first vaccine

Tags
टॉपिकस
Topic Tags: