
नवी दिल्लीः अलास्कामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एक मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी रशियाच्या बरेंट्स समुद्राजवळ असलेल्या आपल्या गुप्त चाचणी केंद्रावर जगातील पहिल्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीची तयारी सुरू केली आहे. हे क्षेपणास्त्र अत्यंत धोकादायक असून, त्याची मारा करण्याची क्षमता अमर्याद आहे आणि ते ज्या लक्ष्यावर मारा करेल, त्याच्या आजूबाजूच्या एक ते दोन किलोमीटर परिसराचा संपूर्ण विनाश करण्याची क्षमता यात आहे.