

रशिया (Russia) पुढील वर्षी १,७५,००० सैन्यांसह हल्ला करण्याची तयारी करीत (Preparing to attack) आहे. वॉशिंग्टन पोस्टने वृत्तात ही माहिती दिली आहे. याआधी युक्रेनने (Ukraine) पुढच्या महिन्यात मोठ्या प्रमाणावर हल्ल्याची योजना आखली जाऊ शकते, असा इशारा दिला होता. अमेरिकन प्रशासनाच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, मॉस्कोच्या योजनांमध्ये चिलखत, तोफखाना आणि इतर उपकरणांसह अंदाजे १,७५,००० सैनिकांसह शंभर बटालियन गटांच्या व्यापक हालचालींचा समावेश आहे.
रशियाने युक्रेनविरुद्ध आक्रमक कारवाईची योजना आखली आहे, असे दर्शविणाऱ्या पुराव्यांबद्दल अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे (US Department of Defense) म्हणणे आहे. पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल टोनी सेमेलरोथ म्हणाले, आम्ही पूर्व युक्रेनमधील संघर्षावर मुत्सद्दीपणे तोडगा काढण्यासाठी समर्थन करीत आहोत. त्यामुळे या भागातील तणाव कमी होईल.
दुसरीकडे रशियाच्या सीमेवर हजारो सैनिक पाठवल्यानंतर युक्रेनने संरक्षणासाठी युद्धाची तयारी तीव्र केली आहे. युक्रेनने ब्रिटनसोबत १.७ अब्ज पौंडांचा संरक्षण करार केला आहे. याअंतर्गत ब्रिटन युक्रेनला घातक युद्धनौका देणार आहे. रशियन सैन्य सध्या चार आघाड्यांवर मोठ्या प्रमाणावर काम करीत आहे. नवीन टॅंक आणि तोफांव्यतिरिक्त ५० रणांगण रणनीतिक गट तैनात करण्यात आले आहेत. युक्रेनवर हल्ला करण्याची रशियन योजना रोखण्यासाठी नवीन धोरणे तयार करत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी म्हटले आहे.
रशियाने युक्रेनच्या सीमेवर सैन्य तैनात केल्याची माहिती वॉशिंग्टन आणि कीव या दोन्ही देशांनी दिली आहे. युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी अंदाज व्यक्त केला आहे की रशियाचे सीमेजवळ सुमारे १,००,००० सैन्य आहे. दुसरीकडे रशिया कोणत्याही लष्करी तैनातीला नकार देत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.