कोरोनावर औषध तयार; दहा देशांकडून औषधांची मागणी

वृत्तसंस्था
Friday, 12 June 2020

एविफेविर असं या औषधाचे नाव असून हे औषध देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील काही रुग्णालयांमध्ये आणि क्लिनीकमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोनावर औषध तयार झाल्याची अधिकृत घोषणा रशियाकडून करण्याक आली आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रशियाने एका अ‍ॅण्टी व्हायरल औषधाला त्यांच्याकडून अधिकृत मान्यता दिली आहे. एविफेविर असं या औषधाचे नाव असून हे औषध देशाच्या वेगवेगळ्या भागांमधील काही रुग्णालयांमध्ये आणि क्लिनीकमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे औषध चार दिवसांत कोरोनाचा रुग्ण बरा करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

रशियामधील रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे (आरडीआयएफ) सार्वभौमत्व अधिकार असणाऱ्या मंडळाने प्रसिद्धीपत्रकामध्ये याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. हे औषध बनवण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांची मदत घेण्यात आली असून त्यामध्ये केमरार या कंपनीचा ५० टक्के वाटा असल्याचे सांगण्यात आले आहे. या औषधाच्या क्लिनीकल चाचण्या अगदी अल्पावधीमध्ये करण्यात आल्या आहेत. या औषधाची मागणी आणि गरज लक्षात घेता विशेष नियमांअंतर्गत आरोग्य मंत्रालयाने या औषधाच्या वापराला तातडीने परवानगी दिली आहे. इतर देशांमध्ये वेगवेगळ्या लस आणि त्यासंबंधित संशोधन आणि क्लिनीकल ट्रायल मोठ्या संख्येने सुरु असतानाच रशियाने मात्र कमी लोकांवर याचा प्रयोग करत औषधाच्या वापराला परवानगी दिली आहे. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता या औषधाच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सध्या कोरोनावर लस उपलब्ध नाही. तसेच जगभरामध्ये सुरु असणाऱ्या चाचण्यामध्ये अद्याप परिणामकारक असे निकाल हाती आलेले नसल्याने लस बनवण्यासाठी आणखीन काही कालावधी लागणार आहे. आरडीआयएफकडून दिलेल्या माहितीनुसार केमरारच्या माध्यमातून महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येईल इतक्या प्रमाणात औषध बनवण्याची योजना आहे. दहाहून अधिक देशांनी आताच एविफेविरची मागणी केली असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

एविफेविर औषधाची मूळ ओळख फॅव्हीपीरावीर म्हणून
एविफेविर हे औषध फॅव्हीपीरावीर म्हणून ओळखले जाते. १९९० साली जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती केली होती. जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती करते. जपानमध्ये ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा वापर केला जातो. औषधाची परिणामकारकता वाढवण्यासाठी रशियन शास्त्रज्ञांनी त्यामध्ये काही बदल केले.

रशियातील कोरोनाची परिस्थिती
जगभरामध्ये कोरोनावरील लसीवर संशोधन सुरु असतानाच रशियामधील करोनाबाधितांचा आकडा पाच लाखांहून अधिक झाला असून गुरुवारपर्यंत रशियामध्ये कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख २ हजार ४३६ इतकी होती. सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांच्या यादीमध्ये रशिया तिसऱ्या स्थानी असून केवळ अमेरिका आणि ब्राझीलमध्ये रशियापेक्षा अधिक रुग्ण आहेत. असं असलं तरी रशियामध्ये मृत्यूदर कमी असून येथे करोनामुळे आतापर्यंत ६ हजार ५३२ मृत्यू झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russia rolls out first approved drug as infections pass 500000

Tags
टॉपिकस
Topic Tags: