Missile test of russia
Missile test of russiaSakal

आंतरखंडीय क्षेपणास्त्राची रशियाकडून चाचणी; पुतीन म्हणाले...

शत्रूंना दोनदा विचार करायला लावेल असं ते क्षेपणास्त्र आहे." पुतीन यांनी सांगितलं.

मॉस्को : रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या तणावाल जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. त्यातच रशियाने एका नवीन क्षेपणास्त्राची (Missile) चाचणी केली असल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांनी दिली. "आम्ही अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असणाऱ्या 'सरमत आंतरखंडीय क्षेपणास्त्रा'ची यशस्वी चाचणी केली असून शत्रूंना दोनदा विचार करायला लावेल असं ते क्षेपणास्त्र आहे." पुतीन यांनी सांगितलं.

रशियाने चाचणी केलेल्या या क्षेपणास्त्राला वैज्ञानिकांनी सैतान २ असं नाव दिलं असून रशियाच्या पुढच्या पिढीतील क्षेपणास्त्रांपैकी हे एक असल्याचं म्हटलंय. या क्षेपणास्त्रांच्या यादीत किन्झाल आणि अवांगार्ड हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचाही समावेश असून सरमत या क्षेपणास्त्राला पुतीन यांनी 'अजिंक्य' अशी उपमा दिली आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की रशियन सैन्य 24 फेब्रुवारीपासून युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाईत गुंतले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदाच किंझाल या क्षेपणास्त्राचा वापर केला.

Missile test of russia
'प्रत्येक पापी व्यक्तीला भविष्य असते', बलात्कार-हत्येप्रकरणी SC कडून फाशीची शिक्षा रद्द

"सरमत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो," असे पुतीन यांनी बुधवारी दूरचित्रवाणीवर बोलताना लष्कराला सांगितले. "हे अद्वितीय शस्त्र आमच्या सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता मजबूत करेल, बाह्य धोक्यांपासून रशियाची सुरक्षितता मजबूत करेल आणि जे आपल्या देशाला धोका देण्याचा प्रयत्न करतात त्यांना दोनदा विचार करायला लावेल," पुतिन म्हणाले.

या क्षेपणास्त्राची चाचणी उत्तर रशियातील प्लेसेत्स्क कॉस्मोड्रोम येथे "यशस्वीपणे" पार पडली असल्याचं संरक्षण मंत्रालयाने सांगितलं आहे. क्षेपणास्त्राचे रशियाच्या पूर्वेकडील कामचटका प्रायद्वीपच्या कुरा चाचणी श्रेणीमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं असल्याचंही सांगितलं.

Missile test of russia
धनंजय मुंडेंना बलात्काराची तक्रार नोंदविण्याची धमकी, ५ कोटी खंडणीची मागणी

"सरमत हे जगातील सर्वात लांब पल्ल्याचे लक्ष्य नष्ट करणारे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र आहे, जे आपल्या देशाच्या आण्विक शक्तीत लक्षणीय वाढ करेल, सरमत सुपरहेवी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची रचना क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणालींना दूर ठेवण्यासाठी केली गेली आहे, ज्यामुळे शत्रूंवर पाळत ठेवण्यासाठी एक लहान विंडो मिळते." असे मंत्रालयाने म्हटले आहे.

200 टनांपेक्षा जास्त वजनाचे आणि अनेक शस्त्रास्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र पृथ्वीवरील कोणत्याही लक्ष्यावर मारा करू शकते. असं पुतीन यांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com