रशिया-युक्रेनमध्ये तणावाचं वातावरण; भारताने स्पष्ट केली भूमिका

अमेरिकेनं दावा केला आहे की,'रशियाने सात हजार अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केले आहेत.' रशिया आणि युक्रेनच्या संघर्षावर आता भारताने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.
Russia Ukraine crisis India says in touch with all concerned parties
Russia Ukraine crisis India says in touch with all concerned partiessakal

न्यूयॉर्क - रशिया आणि युक्रेन यांच्यात तणावाचं वातावऱण आहे. यामुळे जगातील अनेक देशांची चिंता वाढली आहे. अमेरिकेसह अनेक देशांनी रशिया-युक्रेन यांच्यात युद्धाची ठिणगी पेटल्यास त्याचे परिणाम भयंकर असतील असं म्हटलं आहे. रशियाने त्यांचे सैन्य माघारी घेत असल्याचं सांगितलं असलं तरी अमेरिकेनं याचे पुरावे मागितले आहेत. अमेरिकेनं दावा केला आहे की,'रशियाने सात हजार अतिरिक्त सैनिक सीमेवर तैनात केले आहेत.' रशिया आणि युक्रेनच्या संघर्षावर आता भारताने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताकडून यावर स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे प्रतिनिधी टीएस तिरूमूर्ती यांनी सांगितले की, भारताची भूमिका हीच राहिल की, कोणत्याही प्रकारे लवकरात लवकर स्थिती सामान्य करण्यात यावी. टीएस तिरूमूर्ती म्हणाले की, तणाव कमी होण्याऐवजी वाढेल अशी कोणतीही पावले उचलणं सध्या टाळलं पाहिजे. फक्त रणनिती आणि चर्चेतून या समस्येवर तोडगा काढता येऊ शकतो. याप्रकरणी भारताकडून संबंधित सर्वांशी संपर्क केला जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचं तिरूमूर्ती यांनी सांगितले.

सध्या तरी दोन्ही देशांमध्ये असलेला तणाव कमी करण्यावर भर द्यायचा असल्याचं भारताने सांगितलं. तसं प्रत्येक देशाच्या सुरक्षेवर चर्चा होणं गरजेचं आहे कारण त्यामुळे शांतता निर्माण होऊ शकते असंही भारताकडून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत सांगण्यात आलं. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबतही टीएस तिरूमूर्ती यांनी माहिती दिली. भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला देशाचे प्राधान्य आहे. याशिवाय तणाव पुर्ण करण्यासाठी Minsk Agreement ला समर्थनही दर्शवले आहे. २०१४ आणि २०१५ मध्ये बेलारूसची राजधानी मिन्स्कमध्ये करार झाला होता. त्याला मिन्स्क करार म्हटलं जातं

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com