esakal | रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना
sakal

बोलून बातमी शोधा

रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना

रशियाचे इमर्जन्सी मिनिस्टर जिनिचेव्ह यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

रशियाच्या मंत्र्याचे निधन; कॅमेरामनला वाचवताना दुर्घटना

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मॉस्को - रशियाचे इमर्जन्सी मिनिस्टर जिनिचेव्ह यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रशियन माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जिनिचेव लष्करी अभ्यासावेळी व्हिडिओ शूटिंग करणाऱ्या कॅमेरामनला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कॅमेरामनला पाण्यात पडण्यापासून ते वाचवायला गेले आणि त्यांचाच पाय घसरून पडले. यात त्यांच्यासह कॅमेरामनचाही मृत्यू झाला आहे.

जिनिचेव्ह यांच्या मृत्यूनतर इमर्जन्सी मंत्रालयाकडून याची माहिती देण्यात आली. त्यात म्हटलं आहे की, तुम्हाला हे सांगताना दु:ख होत आहे की, आर्किटिक क्षेत्राला आपत्कालीन स्थितीतून वाचवण्यासाठी इंटर एजन्सी सराव सुरु आहे. यावेळी नेरिल्स्कमध्ये एका व्यक्तीला वाचवण्याच्या प्रयत्नाता येवेगेनी जिनिचेव्ह यांचा मृत्यू झाला आहे.

सराव सुरु असलेल्या ठिकाणी अनेकजण उपस्थित होते पण नेमकं काय झालं हे कुणीही सांगू शकलेलं नाही. जिनिचेव्ह यांनी कॅमेरामनला वाचवण्यासाठी प्रयत्न केले मात्र तेच पाण्यात असलेल्या दगडावर पडले असं ट्विट RT न्यूज ब्रॉडकास्टरच्या चीफ एडिटर सिमोन्यान यांनी केलं आहे.

loading image
go to top