esakal | नवाल्नीबाबत ‘नकाराधिकार’; उपचारासाठी जर्मनीला नेण्यास मनाई
sakal

बोलून बातमी शोधा

Alexei-Navalny-St.-Petersbu

ओम्स्क हे सायबेरियातील शहर आहे,जे बर्लिनच्या पूर्वेस सुमारे 4200किलोमीटर अंतरावर आहे.सहा तासांच्या विमान प्रवासाने तेथे जाता येते.आवश्यक त्या आधुनिक वैद्यकिय सुविधा असलेले विमान सज्ज करण्यात आले.

नवाल्नीबाबत ‘नकाराधिकार’; उपचारासाठी जर्मनीला नेण्यास मनाई

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मॉस्को - संभाव्य विषबाधेमुळे कोमात गेलेले रशियातील विरोधी राजकीय नेते अॅलेक्सी नवाल्नी यांना उपचारासाठी जर्मनीत हलविण्यास रुग्णालयाने नकार दिला आहे. जर्मन डॉक्टरांना प्रवेश मिळेल इतकीच सवलत देण्यात आली.

मॉस्कोहून सायबेरियातील टोम्स्क येथे जाणाऱ्या विमानात ते बसले होते. चहा घेतल्यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यामुळे विमान ओम्स्क येथे उतरविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण आणखी चांगले उपचार मिळावेत म्हणून जर्मनीतील बर्लिन येथील रुग्णालयात नेण्याची तयारी करण्यात आली होती. ओम्स्क हे सायबेरियातील शहर आहे, जे बर्लिनच्या पूर्वेस सुमारे चार हजार दोनशे किलोमीटर अंतरावर आहे. सहा तासांच्या विमान प्रवासाने तेथे जाता येते. आवश्यक त्या आधुनिक वैद्यकिय सुविधा असलेले विमान सज्ज करण्यात आले, पण नवाल्नी हे हलविता येणार नाहीत असे रुग्ण बनले आहेत, कारण त्यांची प्रकृती अस्थिर आहे, असे रुग्णालयाचे मुख्य डॉक्टर अलेक्झांडर मुराखोवस्की यांनी सांगितले. 

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक असल्यामुळे नवाल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याची शंका सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

नवाल्नी यांना अनेक वेळा तुरुंगात टाकण्यात आले असून त्यांचा छळ करण्यात आला आहे. 2017 मध्ये त्यांच्या चेहऱ्यावर अँटीसेप्टीक द्रव्य टाकण्यात आले होते. त्यात त्यांचा डोळ्याला इजा झाली होती.

निवडणुकीपासून रोखले
नवाल्नी यांनी 2018 मध्ये पुतीन यांच्याविरुद्ध निवडणूक लढविण्याचे तयारी केली होती, पण त्यांना रोखण्यात आले

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विषारी द्रव्याबाबत मौन
नवाल्नी यांच्या शरीरात पोलिसांना अत्यंत धोकादायक विषारी द्रव्याचे अंश सापडले,  पण त्याविषयी माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला. नवाल्नी यांचे सहकारी इव्हान झडॅनोव यांनी ही माहिती दिली.

ट्वीटच गायब
नवाल्नी यांना हलविण्यास रुग्णालयाने मंजुरी दिली नसल्याचे ट्विट त्यांच्या प्रवक्त्या किरा यार्मीश यांनी केले होते. त्यानंतर हे ट्विटच गायब झाल्याचा दावा किरा यांनी केला.

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

संस्था बंद पडली
नवाल्नी यांनी फाऊंडेशन फॉर फायटिंग करप्शन ही संस्था सुरु केली होती. सरकारी अधिकाऱ्यांच्या लाचखोरीचे प्रकार उघडकीस आणले जायचे. गेल्या महिन्यात सरकारशी घनिष्ठ संबंध असलेले उद्योगपती येवगेनी प्रिगोझीन यांनी नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. त्यात विरोधात निकाल लागल्यामुळे जबर आर्थिक नुकसान सोसावे लागल्याने ही संस्था नवाल्नी यांना बंद करावी लागली.

loading image
go to top