esakal | रशियात पुतीन यांचा कट्टर विरोधक रुग्णालयात दाखल; विषप्रयोग झाल्याचा संशय!
sakal

बोलून बातमी शोधा

alexie navalny

सध्या अ‍ॅलेक्सी हे आयसीयूमध्ये असून बेशुद्ध आहेत. अ‍ॅलेक्सी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणूनही ओळखले जातात. 

रशियात पुतीन यांचा कट्टर विरोधक रुग्णालयात दाखल; विषप्रयोग झाल्याचा संशय!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मॉस्को - रशियाचे प्रमुख विरोधी पक्षनेते अ‍ॅलेक्सी नवल्नी यांच्यावर विषप्रयोग झाल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नवल्नी हे सातत्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर टीका करतात. आता नवल्नी यांच्यावर चहातून विषप्रयोग झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

सायबेरियातून अ‍ॅलेक्सी हे विमानातून परत येत होते. तेव्हा विमानात चहातून विष दिल्याचा संशय आहे. या प्रकारामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. नवल्नी यांना ओमस्कच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या अ‍ॅलेक्सी हे आयसीयूमध्ये असून बेशुद्ध आहेत. अ‍ॅलेक्सी हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे कट्टर विरोधक म्हणूनही ओळखले जातात. 

We assume that Alexei was poisoned with something mixed into the tea. It was the only thing that he drank in the morning. Doctors say the toxin was absorbed faster through the hot liquid. Alexey is now unconscious
- Press Secretary of Alexei Navalny; FBK press secretary

विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
अ‍ॅलेक्सी सायबेरियातील टोम्स्क इथून रशियाची राजधानी मॉस्कोला परत येत होते. त्यावेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यानंतर 800 किमी विमान उड्डाण झाल्यानंतर अचानक ओमस्क इथं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अ‍ॅलेक्सी सध्या बेशुद्ध असून त्यांना व्हेंटिलेटरवर टेवण्यात आलं आहे. 

हे वाचा - जीनपिंग टीकाकाराची हकालपट्टी; कम्युनिस्ट पक्षाचा प्राध्यापिका काई शियावर बडगा

अ‍ॅलेक्सी यांची माहिती देत नसल्याचा आरोप
रुग्णालयात दाखल केल्यानंतर अ‍ॅलेक्सी यांच्या समर्थकांनी रुग्णालय प्रशासनावर आरोप केले आहेत. अ‍ॅलेक्सी यांच्या तब्येतीबाबत माहिती दिली जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अ‍ॅलेक्सी यांचे खाजगी डॉक्टर अ‍ॅनास्टसी यांनाही रुग्णालय प्रशासनाने माहिती देण्यास नकार दिला आहे. 

नवल्नी यांच्यावर आधीही विषप्रयोग?
अ‍ॅलेक्सी नवल्नी यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. तेव्हा तुरुंगात असताना त्यांना विषबाधा झाल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं होतं. प्रशासकीय कारणामुळे तेव्हा नवल्नी यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी नवल्नी यांना विषबाधा नाही तर अ‍ॅलर्जीमुळे त्रास झाल्याचं म्हटलं होतं. 

loading image
go to top