मॉस्कोत लँडिंगवेळी विमानाला आग; 41 प्रवाशांचा मृत्यू

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मे 2019

या आगीमागील नेमके कारण समजू शकलेले नसून, चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. बचावलेल्या प्रवाशांनी खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले.

मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये विमानाला लागलेल्या भीषण आगीत 41 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

मॉस्कोच्या शेरेमीटयेवो विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाच्या मागच्या बाजूने अचानक पेट घेतला. या दुर्घटनेत 41 प्रवाशांचा मृत्यू झाला. अनेकांनी आपला जीव वाचविण्यासाठी विमानातून उड्या मारल्या. एअरोफ्लोट एअरलाइन्स कंपनीचे हे विमान होते. मॉस्कोवरुन या विमानाने रशियाच्या म्युरमॅनस्क शहरासाठी उड्डाण केले होते. उड्डाण केल्यानंतर बिघाड झाल्यामुळे लगेचच हे विमान पुन्हा विमानतळाच्या दिशेने फिरले. ७३ प्रवाशांसह ५ क्रू मेंबर या विमानामध्ये होते. ७८ पैकी ३७ प्रवासी या भीषण दुर्घटनेतून बचावले.

या आगीमागील नेमके कारण समजू शकलेले नसून, चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहेत. बचावलेल्या प्रवाशांनी खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Russian Plane Bursts Into Flames During Emergency Landing 41 Dead