#SaathChal वारी सातासमुद्रापलीकडची

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

आपल्या आई-वडिलांविषयी, साथ चल या उपक्रमाविषयी प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. वारी निमित्त #SaathChal साठी तुम्ही काही कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्याचे फोटो, व्हिडिओ आणि लेख webeditor@esakal.com वर आवर्जून पाठवा. 

जगाच्या पाठीवर कुठेही असलो, तरीही आई-वडिलांबद्दल असलेली आपली भावना सारखीच असते. पंढरीची वारी ही पांडुरंगाप्रती असलेल्या भक्तीची, चैतन्याची आणि टाळ-मृदुंगाचा गजर करत होणाऱ्या प्रवासाची वारी असते. विठुमाऊली आणि आपल्या घरची माऊली यांच्यात तसा काहीच फरक नाही. याच भावनेने 'सकाळ माध्यम समूहा'ने यंदा 'वारी विठुरायाची अन आई-वडिलांच्या सेवेची' या संकल्पनेतून 'साथ चल' ही संकल्पना मांडली आहे. यंदाच्या वारीत आपल्या आई-वडिलांसाठी काही अंतर चालणे, अशी या उपक्रमाची कल्पना आहे. हा उपक्रम असेल यंदाच्या 6, 7 आणि 9 जुलै रोजी..! 

तुम्ही पुण्यात नसला तरीही हरकत नाही. विठुमाऊली आणि आपले आई-वडिल यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी 'ई सकाळ'चे व्यासपीठ उपलब्ध आहे. जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे, तिथे तिथे 'महाराष्ट्र मंडळा'च्या माध्यमातून तो एकत्र आलेला असतो. त्यामुळे साथ चल सारखा उपक्रम स्थानिक पातळीवर करणेही शक्‍य आहे. 

आपल्या आई-वडिलांविषयी, साथ चल या उपक्रमाविषयी प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. वारी निमित्त #SaathChal साठी तुम्ही काही कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्याचे फोटो, व्हिडिओ आणि लेख webeditor@esakal.com वर आवर्जून पाठवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saathchal wari global citizens