Baby Born Twice : आश्चर्यच! एकाच बाळाला दिला दोनदा जन्म, वाचा काय आहे प्रकरण

महिलेच्या पोटी एकाच बाळाने दोन वेळा जन्म घेतला आहे.
Baby Born Twice
Baby Born Twice

आपण बऱ्याचवेळा अशा अनेक बातम्या ऐकल्या आहेत की एका महिलेला एकावेळी दोन किंवा तीन मुले झाली. एकत्र पाच मुलं जन्माला आली अशी अनेक प्रकरणं तुम्ही ऐकली असतील किंवा तु्म्हाला माहिती असतील. मात्र आता एक वेगळीच बातमी सध्या समोर आली आहे. यात महिलेच्या पोटी एकाच बाळाने दोन वेळा जन्म घेतला आहे. एका महिलेने 9 महिन्यांच्या प्रेग्नन्सीच्या कालावधीत एकाच बाळाला एकदा नव्हे तर चक्क दोनदा जन्म दिला आहे. महिलेने आपल्या विचित्र प्रेग्नन्सीचा अनुभव सोशल मीडियावर मांडला आहे. (Baby Born Twice)

अमेरिकेतील जॅकलीन स्कूमर या पहिल्यांदाच आई होत आहेत. ही महिला काही दिवासांत एका गोंडळ बाळाला जन्म देईल. मात्र याआधीच तिने काही दिवसांपूर्वीच या बाळाला जन्म दिला होता आणि आता त्याच बाळामुळे ती पुन्हा प्रेग्नंट झाली आहे. आता हे कसं शक्य आहे, नेमकं हे आहे तरी काय असे एक ना दोन बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील.

Baby Born Twice
Noida Twin Towers : पाडल्या जाणाऱ्या ट्वीन टॉवरच्या गुंतवणूकदारांचं काय? पैसे मिळणार का परत

अमेरेकेतील ही महिला जॅकलीन आपल्या एकाच बाळाला दोनदा जन्म देणार असल्याची माहिती मिळत आहे. तिच्या बाळाला स्पाइना बाइफिडा आहे. हा असा आजार आहे जो मुलांना गर्भातच होतो. ही समस्या दूर करण्यासाठी ती बाळाला दुसऱ्यांदा जन्म देत आहे. या आजारात बाळाच्या पाठीचा मणका नीट विकसित होत नाही. यावर जितक्या लवकर उपचार होतील तितकं चांगलं असतं. त्यामुळे डॉक्टरांनी जॅकलीनच्या बाळाला प्रसूतीच्या तारखेआधीच पोटातून बाहेर काढलं आणि त्याच्या पाठीची सर्जरी करून त्याला पुन्हा पोटात ठेवण्यात आलं.

द सनच्या रिपोर्टनुसार जॅकलिनच्या प्रेग्नन्सीच्या 23 व्या आठवड्यात ही सर्जरी झाली आहे. तिच्या प्रेग्नन्सीला आता ३० आठवडे पूर्ण झाले आहेत. आणखी 14 आठवडे बाळ आता गर्भात राहणार आणि पुन्हा डिलीव्हरी झाल्यानंतर ते या जगात येणार आहे. जॅकलिने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कमेंटमध्ये एका व्यक्तीने हे कसं शक्य आहे, गर्भातील एमनिऑटिक सॅक आणि फ्लुएडचं नंतर काय होतं, असे प्रश्न विचारलं.

Baby Born Twice
Noida Twin Towers : पाडल्या जाणाऱ्या ट्वीन टॉवरच्या गुंतवणूकदारांचं काय? पैसे मिळणार का परत

याबाबत अधिक माहिती देताना जॅकलीनने सांगितलं की, बरंच फ्लूएट निघून जातं त्यामुळे फोर फ्लुएड नावाचा एक घटक गर्भात टाकला जातो ज्यामार्फत बाळ स्वतःच फ्लूएड बनवू लागतं. त्यानंतर सॅक बंद केली जाते. हे फ्लूएड लेव्हल योग्य प्रमाणात आहे की नाही हे तपासण्यासाठी जॅकलीन दर आठवड्याला डॉक्टरांकडे जाते. आता काही दिवसांनी तिची सिझेरिअन डिलीव्हरी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com