Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात जीव गमावलेल्या सरबजीत सिंगच्या पत्नीचा अपघातात मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sukhpreet Kaur Sarabjit Singh

सुखप्रीत यांच्यावर तरणतारण येथील भिखीविंद इथं आज अंत्यसंस्कार होणार आहेत.

Pakistan : पाकिस्तानच्या तुरुंगात जीव गमावलेल्या सरबजीत सिंगच्या पत्नीचा अपघातात मृत्यू

2013 मध्ये पाकिस्तानच्या तुरुंगात (Pakistan Jail) जीव गमावलेला भारतीय नागरिक सरबजीत सिंगच्या (Sarabjit Singh) पत्नीचा सोमवारी मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखप्रीत (Sukhpreet Kaur) या दुचाकीवरून जात असताना फतेहपूरनजीक अचानक तोल जाऊन कोसळल्या. त्यांना त्वरित रग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिथं त्यांचं निधन झालं.

सुखप्रीत यांच्यावर तरणतारण येथील भिखीविंद इथं आज अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पूनम आणि स्वप्नदीप कौर अशा दोन मुली आहेत. तर, सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर यांचं छातीत दुखण्याच्या तक्रारीनंतर जूनमध्ये निधन झालं होतं. दलबीर कौरनं आपला भाऊ सरबजीत सिंगला पाकिस्तानच्या तुरुंगातून सोडवण्यासाठी दीर्घ लढा दिला. सरबजीत सिंगचा (49) एप्रिल 2013 मध्ये लाहोर तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.

हेही वाचा: Pashu Aadhar : माणसांप्रमाणं आता म्हशींचंही बनणार आधार कार्ड; PM नरेंद्र मोदींची घोषणा

दहशतवादी आणि हेरगिरीच्या कारवायांमध्ये कथित सहभागासाठी त्याला पाकिस्तानी न्यायालयानं (Pakistan Court) दोषी ठरवलं आणि 1991 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली. तथापि, 2008 मध्ये पाकिस्तान सरकारनं (Pakistan Government) त्याच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती.

हेही वाचा: Mukul Rohatgi : मुकुल रोहतगी होणार देशाचे नवे अ‍ॅटॉर्नी जनरल

Web Title: Sarabjit Singh Wife Sukhpreet Kaur Killed In Road Accident In Punjab Fatehpur Pakistan Police

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanPunjab