esakal | घनींमागे अमेरिकेकडून चौकशीचा ससेमिरा
sakal

बोलून बातमी शोधा

Ashraf Ghani

घनींमागे अमेरिकेकडून चौकशीचा ससेमिरा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वॉशिंग्टन : अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तालिबानने अफगाणिस्तानात ताबा मिळवल्यानंतर देश सोडून जाताना घनी यांनी रोकड घेऊन गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची आता अमेरिकेकडून चौकशी केली जात आहे.

काबूल येथील रशियन दूतावास आणि काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, १५ ऑगस्टला हेलिकॉप्टरमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन घनी यांनी देश सोडला. एवढेच नाही तर रोकड एवढी होती की, राहिलेली रक्कम ही विमानतळावरच सोडून देण्यात आली. परंतु सध्या संयुक्त अरब अमिरातीत असलेले अश्रफ घनी यांनी माध्यमांचे आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले की, केवळ कपड्यानिशी आपण देश सोडला आहे. पण अमेरिकेत संसदेत या प्रकरणाची चौकशीची मागणी होऊ लागली.

यावर खासदार जॉन सोपको यांनी म्हटले की, घनी यांनी पैशासह पळ काढला की नाही, हे अद्याप सिद्ध होऊ शकले नाही. पण आता याप्रकरणाची समितीकडून चौकशी केली जात आहे. यानुसार घनी यांचे सर्व बँक खाते तपासले जाईल.

पंधरा ऑगस्टला काबूलमधून पलायन

तालिबानने १५ ऑगस्टला काबूलवर ताबा मिळवल्यानंतर माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी देशातून पळ काढला. काही दिवसानंतर ते जगासमोर आले. अश्रफ घनी यांनी मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन पलायन केल्याचा आरोप होऊ लागला. परंतु त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत. जिवाला धोका असल्याने देश सोडावा लागला, असे घनी यांनी म्हटले आहे.

loading image
go to top