मक्केतील मोठ्या मशिदीच्या गेटला कारची जोराची टक्कर; घटना CCTVमध्ये कैद

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 31 October 2020

अधिकाऱ्यांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

दुबई- सौदी अरेबियात (Saudi Arab) एका व्यक्तीने शुक्रवारी रात्री स्पीडमध्ये कार चालवत मक्केची मोठी मशिद अल-हरमच्या (Masjid al-Haram) बाहेरील दरवाज्याला जोराची धडक मारली आहे. सौदीच्या सरकारी वृत्त एजेंसीने यासंबंधी माहिती दिली आहे. वृत्त एजेंसीने सांगितले की, ही घटना शुक्रवारी रात्री 10.25 वाजता घडली. एका व्यक्तीने सुरुवातीला बॅरिकेट्सला टक्कर मारली, त्यानंतर त्याने गतीने कार चालवत मोठ्या मशिदच्या दक्षिणेकडील 89 क्रमांकाच्या दरवाज्याला टक्कर मारली.   

कारमधील व्यक्तीला केले अटक

एजेंसीच्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी कार चालवणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. कारमधील व्यक्ती मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अपघातग्रस्त कारला सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरुन काढलं आहे. कोराना महामारीमुळे बंद पडलेली मशिद काही दिवसांपूर्वीच उघडण्यात आली होती.  

फैजल नावाच्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आहे. यामध्ये एक कार स्पीडमध्ये मशिदीला धडकताना दिसत आहे. त्यानंतर तेथे असलेले सुरक्षा अधिकारी कारकडे धाव घेतात. ते कारमध्ये असलेल्या व्यक्तीला बाहेर काढतात आणि त्याला पोलिसाच्या ताब्यात देतात. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. दरम्यान, या घटनेमध्ये कोणाला दुखापद झालेली नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Saudi Arab car hit high speed gate of the masjid al haram mecca